माजी नगरसेवक अकिल शेख यांनी केली स्वखर्चाने साफसफाई.
नागरिकांनी मानले शेख यांचे आभार
सिंदी (रेल्वे) : गावांचे सौन्दर्य अबाधित राखणे, शहर स्वच्छ व सूंदर ठेवणे, ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांसह ग्रामस्थांचीही असते. “आधी केले मग सांगितले” या तत्वानुसार येथील माजी नगरसेवक अकिल शेख यांनी शहरातील पिपरा मार्गावरील सुलभ सौचालय समोर वाढलेली झाडेझुडपे तोडून या परिसराची स्वखर्चाने साफसफाई केल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करीत माजी नगरसेवक अकिल शेख यांचे आभार मानले आहे.
शहरातील पिपरा मार्गावरील सुलभ सौचालय समोर मोकळी जागा असून मागील अनेक वर्षांपासून या मोकळ्या जागेवर काटेरी झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढली होती. तसेच त्या झाडाझुडुपांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधीसह डासांचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. या संदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ता रवी वाघमारे यांनी अनेकदा नगर पालिका प्रशासनाला तक्रार केली मात्र, याकडे नगर पालिका प्रशासनाने लक्ष पुरविले नाही. त्यामुळे या गंभीर समस्येची माहिती रवी वाघमारे यांनी वार्ड नंबर १६ चे माजी नगरसेवक अकिल शेख यांच्या कानावर टाकली. त्यामुळे शेख यांनी तात्काळ या परिसराची पाहणी करून स्वखर्चाने सात-आठ कामगार सांगून वाढलेली काटेरी झाडेझुडपे तोडून परिसर मोकळा केला. त्याठिकाणी जमलेला केरकचरा व दुर्गंधीयुक्त सांडपाण्याची साफसफाई केली.
अकिल शेख हे जनमानसात चांगली प्रतिमा असलेले व्यक्ती आहे. जनतेमध्ये लोकप्रिय असलेले सामाजिक कार्यकर्ता हे सण २०१८ मध्ये प्रथमच नगरसेवक म्हणून नगर परिषद निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यामुळे अकिल शेख हे लोकसहभागातून प्रभागाच्या विकासासाठी झटतात. त्यामुळे नागरिकांच्या या गंभीर समस्येची दखल घेत पिपरा मार्गावर वाढलेली झाडेझुडपे तोडून त्या परिसराची साफसफाई स्वखर्चाने करून दिल्याने रवी वाघमारे, स्वप्नील बेलखोडे, असपाक शेख, सुधाकर वाघमारे, पंकज नंदनवार, संदीप दिवटे, प्रदीप बेलखोडे यांच्यासह वार्ड क्रमांक १६ मधील नागरिकांनी आनंद व्यक्त करीत माजी नगरसेवक अकिल शेख यांचे आभार मानले आहे.
दिनेश घोडमारे, साहसिक न्यूज-24