माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे यांचा विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

0

By साहसिक न्युज 24
प्रतिनिधी/ मुक्ताईनगर:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते , माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला . यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील , विधानपरिषद अध्यक्ष रामराजे निंबाळकर ,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ ,गृहमंत्री दिलीप वळसे , अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ , सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ,अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे ,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील,माजी प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे , माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल ,राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे , राज्यमंत्री अदिती तटकरे, संजय बनसोडे, विद्या चव्हाण, निलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ,मेहबूब शेख, सुरेखा ठाकरे, दिलीप सोनवणे, उदेसिंग पडवी,शिवाजी गर्जे,
राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील,महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!