मानवी मूल्य ही राष्ट्रीय जीवनाची मूल्ये व्हावीत…धम्मा कांबळे
२६नोव्हेंबर ला देवळी येथे स्मृतीशेष नामदेवराव ढोले यांचा प्रथम स्मृती दिन व संविधान दिन साजरा करण्यात आला.भारतीय संविधानाने भारतीयांना स्वातंत्र, समता, बंधुता आणि न्याय ही मानवी मूल्य दिली. ही समाज जीवनाची मूल्य राष्ट्रीय जीवनाची मूल्ये व्हावित. असे प्रतिपादन धम्मा कांबळे (राष्ट्रीय समन्वयक, समता सैनिक दल, यवतमाळ )यांनी केले. निम्मित होते संविधान दिन आणि स्मृतीशेष नामदेवराव महाजन ढोले यांचा प्रथम स्मृतीदिन. देवळी येथील लेण्याद्री बुद्ध विहार, शालवन नगर येथे हा कार्यक्रम संप्पन्न झाला. व्याख्यानाचा विषय होता “भारत राष्ट्र आणि वर्तमान :काही संदर्भ “. अध्यक्ष म्हणून प्रभाकर गंभीर (कवी, समीक्षक, अमरावती )होते. ते म्हणाले संविधान आपले जीवन जगण्याचा भाग झाला पाहिजे. लोकशाहीने आपली वाटचाल झाली पाहिजे. प्रमुख उपस्थिती सिंधू नामदेवराव ढोले (सेवानिवृत्त शिक्षिका, देवळी )होत्या.त्या आपल्या भाषणात म्हणाल्या ‘आपण संविधानाच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे.’या कार्यक्रमाचे प्रस्तविक मनोज गंभीर यांनी केले.तर आभार प्रशांत ढोले यांनी केले. स्मृतीशेष नामदेवराव ढोले यांच्या आठवणी वानखेडे गुरुजी यांनी जागविल्या. तसेच एकनाथ कांबळे यांनी स्मृतीशेष नामदेवराव ढोले यांचे जीवनावर प्रकाश टाकला.मान्यवर मंडळीचा सत्कार सम्मानचिन्ह, सम्मानपत्र व बुके देऊन करण्यात आला.यावेळी परिसरातील साहित्यिक मंडळी उपस्थित होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज गंभीर, राजेश गंभीर, पद्मा प्रशांत ढोले, नितीन ढोले, संध्या प्रवीण ढोले, अश्विनी नितीन ढोले, सविता राजेश गंभीर, अरुणा मनोज गंभीर, दिनेश डोंगरे, प्रवीण ढोले,आकाश साहेबराव गंभीर, अमरदीप मेंढे, कैलास गंभीर यांनी सहकार्य केले.
सागर झोरे साहसिक न्यूज-24