माळेगाव ठेका येथील सरपंच प्रभाकर घाडोळेचा महाभ्रष्टाचार उघड

0

साहसिक न्युज 24:
मदनी (आमगाव)/ गजेंद्र डोंगरे :
माळेगाव ठेका येथील ग्रामपंचायती मधील मनमानी कारभारामुळे संतप्त नागरिकांनी वरिष्ठांना दिली तक्रार. माळेगाव येथील ग्रामपंचायत शिपाई रमेश आटे हे 31 मे 2020 रोजी सेवानिवृत्त झाले होते. मात्र दुसऱ्या दिवशी दिनांक 1 जून 2020 रोजी नागरिकांना कोणतीही पूर्व सूचना न देता किंवा कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा गावात दवंडी न देता नितेश आटे यांची शिपाई या पदावर निवड करण्यात आली होती.त्यामुळे गावात चर्चेचा विषय रंगला असून निवड प्रक्रियेवर शंका निर्माण होत होती. त्यामुळे गावकऱ्यांनी याचा विरोध करून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा, तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती आर्वी यांना तक्रार सादर करण्यात आली होती. नोव्हेंबर 2020 मध्ये शिपाई पद रिक्त झाले असल्याने त्या जागेवर सेवानिवृत्त शिपायाच्या मुलाला परस्पर शिपाई पदावर नेमण्यात आले असल्यामुळे रीतसर नियम बाह्य निवड केल्याबाबत स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतल्या नंतर ग्रामपंचायतीने एक महिन्या आधी जाहिरात लावून तसेच दवंडी देऊन अर्ज मागविण्यात आले होते. त्यामुळे 26.4.2022 रोजी परिक्ष घेण्यात आली होती.या गावातील 8 युवकांनी शिपाई पदाकरीता अर्ज सादर केले होते. दिनांक 26 एप्रिल 2022 ला परीक्षा घेण्यात आली होती.मात्र, या पेपरची माहिती दोन दिवसा अगोदर लिक झाली असल्याची माहिती गावातील नागरिकांकडून सांगितल्या जाते.परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थींना अगोदरच घोळ झाला असल्याचे समजताच त्यांच्यातून रोष व्यक्त होत आहे. मात्र, निवड परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी टाळाटाळ होत असून तारखेवर तारीख दिल्या जात असल्याचे नागरिकांकडून सांगितल्या जात आहे.वारंवार पाठपुरावा करून अखेर दिनांक 4 मे 2022 रोजी निकाल प्रसिद्ध केला. मात्र, परीक्षेत घोळ झाला असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप असून ग्रामसेवक व सरपंच यांनी पूर्वी नियुक्त केलेल्या मुलाला पेपर बाबत सर्व माहिती दिल्याचा आरोप विद्यार्थी तसेच नागरिक करीत आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशीची मागणी नागरिकांकडून होत आहे.

ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार चव्हाट्यावर

1. दलित वस्ती चा रोड लोकेशन प्रमाणे न घेता दुसऱ्याच वार्डात घेण्यात आला मात्र दलित वस्तीत अद्याप व्यवस्थित रोड नाही.
2. माळेगाव येथील पाझर तलाव असून या तलावाचा लिलाव करण्यात येत नसून परस्पर जवळच्या व्यक्तीला तलाव देण्यात येत असते.
3. गावातील बाभळीची झाडे कमी दरात दहा हजार रुपयांमध्ये विकण्यात आले.
4 महाराष्ट्र दिन सरपंच तसेच ग्रामसेवक उपस्थित नसणे
5. ग्रामपंचायत वारंवार बंद राहणे.
ग्रामपंचायतीच्या या मनमानी कारभार याविषयी सखोल चौकशी करावी अशी मागणी माळेगाव ठेका येथील संतोष साहू,अमोल बंने,रितेश दिघडे, विजय घाटोळ, अजय निकुळे, अक्षय बैस,राजू धरवार, प्रशांत चौधरी ,प्रवीण बन्नगरे, पंकज लेंडे, सुरज काकडे ,चरण बंनगरे, विठ्ठल नागोसे, कृष्णा नागोसे यासह गावकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!