मुक्ताईनगरात धाडसी दरोडा; ज्वेलर्स दुकान फोडून ३० लाखाचे दागिने केले लंपास
मुक्ताईनगरात धाडसी
दरोडा; ज्वेलर्स दुकान फोडून
३० लाखाचे दागिने केले लंपास
मुक्ताईनगर / पंकज तायडे:
शहरातील अंबिका ज्वेलर्स दुकानात चोरट्यांनी धाडसी
दरोडा टाकत ३० लाखाचा सोने आणि चांदीचे दागिने लंपास करण्या आल्याने शहरात भर बाजारपेठेत
असलेल्या सराफा दुकानातील या धाडसी दरोड्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालेली आहे. शहरातील भुसावळ रोडवर असलेल्या अंबिका ज्वेलर्स या सराफा दुकानात रात्री धाडसी दरोडा घालण्यात आला. आज सकाळी ही बाब उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात साहसिक न्युज24 च्या प्रतिनिधीने दुकानाच्या मालकांशी संपर्क केला असता त्यांनी याबाबतची माहिती दिली. मुक्ताईनगर शहरातील भुसावळ रोड येथील अंबिका ज्वेलर्स हे दुकान काल रात्री चोरट्यांनी फोडून 30 ते 35 किलो चांदी व 100 ग्रॅम सोने असा अंदाजे तीस लाखाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे . असे दुकान मालक अनिल शूरपाटणे यांनी सांगितले,
तसेच चोरट्यांनी कॅमेरे ची वायर कापून डीव्हीआर सुद्धा लंपास केला. पोलीस मुक्ताईनगर शहरातील विविध
ठिकाणी जाऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करीत असून डॉग पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आले आहे.