मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा बनलीय विमल गुटखा ची मोठी बाजार पेठ
मुक्ताईनगर/ पंकज तायडे:
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा हे गाव जळगावजिल्हाचे टोकाचे गाव आणि मध्यप्रदेश सीमे लागतचे आणि विदर्भ म्हणजे बुलढाणा लागून आहे.विमल गुटखा हा गुजरात प्रदेशातून नवापूर बॉर्डर आणि मध्यप्रदेशचा बॉर्डर बऱ्हाणपूर मार्गे येत असतोत्यामुळे याकुऱ्हा काकोडा गावाला संधी बाजार पेठेची मिळाली आहे.या गावचे व्यापारी विदर्भात घर पोहच विमल गुटखा देत आहे,तर काही विदर्भातील व्यापारी जीगाव मंडवा आडोळ मार्गे आणि धोपेश्वर मलकापूर मार्गे येऊन विमल गुटखा घेऊन जात असतात दररोज हजारो रुपयाची उलढाल या विमल गुटखा ची होत आहे.महाराष्ट्र शासनाने गुटखाबंदी कायदा केलेला आहे.
तरी पण कुऱ्हा गावासाठी हा कायदा लागू नाही का? मग जळगाव जिल्हा पोलीस खाते व अन्न व औषध प्रशासन विभाग या अवैध गुटखा विक्रेत्यांकडे दुर्लक्ष का करीत आहे
जळगाव जिल्हा पोलीस अधिकारी व अन्न औषध विभागाचे अधिकारी आपल्या खात्यातील चतुर्थश्रेणी चे कर्मचारी पाठवून हप्ते गोळा करून जनतेसमोर रोड शो करून आपल्या गाड्या फिरून आम्ही काहीतरी करीत आहो असे भासवण्याचा प्रयत्न करीत असतात, नंतर आपल्या प्रायव्हेट वाहनाने येऊन हपत्ते गोळा करून घेऊन जातात अशी चर्चा परिसरामध्ये आहे.
कुऱ्हा काकोडा परिसरामध्ये जळगाव जिल्हा पोलिसा चे हपत्ते जमा करणारा पंटर असल्याचे बोलले जात आहे.
हा पंटर कोण आहे? त्याची कोणी नेमणूक केली आहे?या अशा प्रकारामुळे कुऱ्हा काकोडा विमल गुटखा ही बाजारपेठेची निर्मिती झालेली आहे.सामान्य माणसाने जर का तक्रार दिली तर कारवाई होणे शक्य नाही,मात्र कोण्या एका जबाबदार राजकीय पक्षाच्या आमदार खासदार व पदाधिकाऱ्यांनी जर तक्रार केली खरंच कारवाई शक्य होत असते,नाहीतर कारवाई दोन तीन वर्षातून मार्च महिन्यात मध्ये होत असते माल लाखोचा मात्र पंचनामा हजाराचा असतो यामागचे कारण म्हणजे हपत्ते घेण्याचे एकमेव कारण!
………………….
हा विमल गुटखा किशोरवयीन मुले शाळेतील विद्यार्थी मजूर वर्गातील महिला व पुरुष सुशिक्षित बेरोजगार या वर्गातील लोक गुटखा सेवन करीत असतातयाचे दुष्परिणाम कॅन्सर चे प्रमाणात वाढ महिला वर्गामध्ये गर्भाशयावर परिणाम अशा अनेक रोगांना आमंत्रण म्हणजे विमल गुटखा या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने विमल गुटखा बंदी केलेली आहे .मात्र महाराष्ट्र शासन त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये असमर्थ ठरलेले दिसत आहे. त्यांना जनतेचे काय घेणेदेणे नाही, त्यांना आपली प्रॉपर्टी कशी वाढेल याकडे त्यांचे लक्ष वेधले असते