मुख्यमंत्री यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह
Byसाहसिक न्युज 24
22जुन 2022
मुंबई : राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकारणाचा हा संपूर्ण संघर्ष सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांची कोरोनाची अँटीजन टेस्ट पॉझिटीव्ह असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने ते मंत्रिमंडळ बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होणार असल्याची माहिती आहे. तसंच महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोरोनाची अँटीजन टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. मात्र त्यांची आरटीपीसीआर टेस्ट मात्र निगेटीव्ह आल्याची माहिती आहे. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून अजूनही या बातमीला दुजोरा देण्यात आलेला नाही.
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर वृत्तीमुळे राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे आज सायंकाळपर्यंत पदाचा राजीनामा देऊ शकतात. याआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे ट्विटही समोर आले होते, त्यानंतर उद्धव ठाकरे हे पदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तवली जात होती.