मुनगंटीवार यांच्याकडे सोपवावे वर्ध्याचे पालकमंत्रिपद , वर्धा श्रमिक पत्रकार संघाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Byसाहसिक न्युज 24
प्रतिनिधी/ वर्धा:
वर्धा जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. जगाच्या नकाशावर जिल्ह्याचे नाव असून, महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी म्हणून येथील शाश्वत आणि सर्वांगीण विकासाकरिता जिल्ह्याचे पाककमंत्री म्हणून यापूर्वी अमिट छाप सोडणारे माजी अर्थ तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची निवड करावी, अशी मागणी वर्धा श्रमिक पत्रकार संघाने मुख्ममंत्री तथा उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. भाजपा-शिवसेनेच्या मागील सरकारच्या काळात सुधीर मुनगंटीवार यांनी वर्धा जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या कामांसाठी, प्रकल्पांसाठी भरघोस निधी दिला, अनेक दर्जेदार कामे तडीस लावली. त्यामुळे अशा कार्यक्षम मंत्र्याची वर्धा जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून गरज असल्याचे मत नवनियुक्त मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने कळविण्यात येणार आहे.
वर्धा जिल्ह्यात कधी नव्हे इतक्या वेगाने आणि प्रमाणात विकास सुधीर मुनगंटीवार यांच्या पालमंत्रीपदाच्या कारकीर्दीत झाला, हे नागरिकही मान्य करतात. सुधीर मुनगंटीवार यांनी पालकमंत्री म्हणून वर्धेला मोठ्या प्रमाणात न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वर्धा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांना पुन्हा एकदा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री नियुक्त कण्यात यावे.
आ. मुनगंटीवार हे तत्काळीन मुख्मंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अर्थ, वनमंत्री होते. त्यांच्याकडे चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी होती. त्या काळात त्यांनी दोन्ही जिल्ह्यांना समान न्याय दिला. वर्धा जिल्ह्याच्या विकासाकरिता त्यांनी जिद्दीने काम केले. वर्ध्यात जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी अधिकारी कार्यालय, नगरपालिकेच्या नव्या इमारतीचे बांधकाम, शहरातील विविध रस्त्यांचे सिमेंटीकरण आणि सौंदर्यकरण, बसस्थानकाचा कायापालट केला. सेवाग्राम विकास आराखडा या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला गती दिली. एकट्या वर्धा शहराकरिता नगरपालिकेमार्फत 100 कोटींपेक्षा जादाचा निधी मिळवून दिला. आमार मुनगंटीवार यांना वर्धा जिल्हाचा परिपूर्ण अभ्यास आहे. मुनगंटीवार यांनी वर्ध्यातील पत्रकारांनाही अतिशय सन्मानाची आणि स्नेहाची वागणूक दिलेली आहे. वर्धा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा उर्वरित अनुशेष भरून काढण्याकरिता आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पालकमंत्री म्हणून वर्धा जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात यावी, अशी मागणी वर्धा श्रमिक पत्रकार संघाने केली आहे.