मुलींची छेड काढणाऱ्या मजनूला संतप्त पालकांनी दिला चोप.

0

🔥 घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

🔥 मागील एक महिन्यांपासून काढत होता मुलींची छेड.

🔥 पोलिसांनी दिला होता तक्रार घेण्यास नकार.

सिंदी (रेल्वे) : मागील एक महिन्यांपासून येथील केसरीमल नगर विद्यालयाच्या मुलींची छेड काढत अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला संतप्त पालकांनी तसेच नागरिकांनी अंगावरील कपडे फाटतपर्यंत चांगलाच चोप दिला. घटनेनंतर आरोपीची शहरात धिंड काढत पालकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रीतम सहारे (32) असे आरोपीचे नाव असून पळसगाव रोड बेगरवस्ती सिंदी (रेल्वे) येथे मागील सात वर्षांपासून राहत असल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून जखमी आरोपीला वर्धेच्या इस्पितळात दाखल केले आहे.
प्राप्त माहितीनुसार येथील केसरीमल नगर विद्यालयाच्या बाजूला असलेल्या माता मंदिर जवळ मागील एक महिन्यांपासून आरोपी प्रीतम सहारे हा सकाळी 6.00 ते 7.30 वाजताच्या सुमारास रोज नित्यनेमाने शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या अल्पवयीन मुलींची छेड काढत त्यांना लज्जास्पद अश्लील चाळे करून पळ काढायचा. याबाबत मुलींनी शाळेच्या शिक्षकांना तसेच घरी आपल्याला पालकांना ही बाब सांगितली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शाळेचे मुख्याध्यापक विलास येखंडे शाळेचे शिक्षक तसेच पालक 27 डिसेंम्बर रोजी सिंदी पोलिसात फिर्याद देण्यासाठी गेले. परंतु, कर्त्याव्यवर असलेले पोलीस शिपाई प्रशांत श्रीवास्तव यांनी नको ती झनझट लागावी म्हणून फिर्याद दाखल करून घेतली नाही. त्यामुळे त्या आरोपीला पकडण्यासाठी शिक्षक व पालक रोज त्याच्या मागावर होते. परंतु, आरोपी हाती लागत नव्हता. याबाबत शिक्षकांनी अधिक माहिती घेतली असता तो संशयिय आरोपी हा पळसगाव रोडवरील बेघरवस्तीमध्ये राहत असल्याचे समजले. परिणामी, त्या संशयित आरोपीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे तो संशयित आरोपी नागरीकांच्या निदर्शनास येताच शुक्रवारी सकाळी त्याला पकडून आणत शाळेत मुलींसमोर उभा केला. मुलींनी आरोपी प्रीतम सहारे याला बघताच हा तो छेड काढणारा आरोपी असल्याचे मुलींनी खात्री पटवून सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी तसेच नागरिकांनी आरोपीला अंगावरचे कपडे फाटतपर्यंत चोप दिला. त्यानंतर आरोपीची शहरात धिंड काढत पोलीस ठाण्यात नेले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आरोपी प्रीतम सहारे विरोधात विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

 सिंदी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह.

27 डिसेंम्बर रोजी सकाळी आरोपी प्रीतम सहारे याने रस्त्यात मुलीला आडवा होऊन छेड काढली. याप्रकरणी मुलींच्या पालकांनी व शिक्षकांनी सिंदी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही. शिवाय, त्या घटनेची साधी चौकशी सुद्धा केली नाही. आम्ही पोलिसांची गाडी पाठवून शाळेच्या परिसरात पेट्रोलिंग करतो असे पोलीस शिपाई प्रशांत श्रीवास्तव यांनी पालकांना सांगून बोळवण केली. मात्र, कोणताही पोलीस कर्मचारी पेट्रोलिंगसाठी आला नसल्याचे केसरीमल नगर विद्यालयाचे शिक्षक अमोल गवळी व पालक गजानन घोडे यांनी बोलतांना सांगितले. मागील एक महिन्यापासून आरोपी मुलींची छेड काढत होता. त्यामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी घटनेची दखल घेतली नसल्याने सरतेशेवटी पालकानांच कायदा हातात घेत आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करावे लागल्याने सिंदी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.हाच तो प्रीतम सहारे मुलीची छेड काढणाऱ्या संतप्त  पालकांनी दिला चोप.

दिनेश घोडमारे साहसिक न्यूज / 24 सिंधी रेल्वे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!