सतत सुरू असलेल्या पावसामुळे नागझरीचा पुल वाहून सेवाग्राम पवनार रोड होणार रात्री पासून बंद… ? बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार येणार चव्हाट्यावर?
साहसिक न्युज24
सतिश अवचट/ वर्धा:
पवनार येथून सेवाग्राम जाणाऱ्या रोडचे बांधकाम कित्येक दिवसा पासून सुरू आहे. मात्र या कामावर देखरेख ठेवणारे सरकारी अधिकारी यांचे सुरू असलेले काम पाहून कोरोना काळात डिग्री घेवून पास झालेले अधिकारी आहे, की काय असा प्रश्न उपस्थित होतो.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पवनार- सेवाग्राम रोडचे काम सुरू करण्याअगोदर सरकारी अधिकारी यांच्या कडून कामाची पूर्ण पाहणी करू कशा पद्धतीने काम करायचे आहे. ते ठरवले जाते व मगच कामाला सुरुवात होते. परंतु पवनार सेवाग्राम रोडच्या बांधकामात भलताच गोंधळ दिसून येत आहे. या रोडवर बाराही महिने वाहणारे दोन नाले आहे.त्यात नागझरी आणि संडाचा पुल त्यातील नागझरी पुलाचे काम मागच्या वर्षी पासून सुरू आहे. पुलाचे काम सुरू करताना पुलावरील वाहतूक दुसरी कडे वळवून पुलाचे काम सुरू करण्यात येते मात्र नागझरी पुलाचे काम सुरू करून वाहतूक बाजूला दोन पायल्या व त्यावर माती टाकून काच्चा रोड बनवून सुरू केली पण या बाबत बातमी प्रकाशित करताच पायल्या काढून थेट पुलातून वाहतूक सुरू करण्यात आली होती. पावसाळा जाताच पुन्हा पूलात पायल्य टाकून वाहतूक सुरू केली पण आता पुन्हा पावसाळा सुरू झाला असून दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस जिल्हात सुरू आहे. यामध्ये पुला खालून पाणी जाण्यास मार्येग नसल्याने पाणी तिथेच जमा होत आहे. अशाच पाऊस रात्रभर सुरू राहिला तर निकृष्ट दर्जाचे बांधकाम केलेला पुल वाहून जाण्यास वेळ लागणार नाही. टाकलेल्या पायल्या व माती वाहून गेली तर सेवाग्राम वरून नागपूरला जाणाऱ्या रुग्णवाहिका कुठून जाणार सोबतच गावातील ६० टक्के शेतकरी याच रोडवरून आपली शेती वाहतात. सद्या शेतीचा हंगाम सुरू असून रोड जर वाहून गेला तर त्यांची शेती पडीत राहण्या शिवाय दुसरा मार्ग नाही. हे सुद्धा रोडवर देखरेख ठेवणाऱ्या अभियंता यांना जर कळत नसेल तर यांनी जी डिग्री घेतली ती कोरोणा काळात घेतली की पैसे भरुन पास झाले हे कळायला मार्ग नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष देवून असे नियोजन शून्य काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी समोर होणारा धोका टाकून यावे लवकरात लवकर योग्य मार्ग काढावा