हिंगणघाट /शहरातील अल ख़िदमत फॉऊन्डेशनद्वारा स्थानिक डॉ.आंबेडकर पुतळा परिसरात या सामूहिक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले.समारोहामध्ये स्थानिक जामा मस्जिदचे इमाम साहेब तसेच सर्व मस्जिदचे इमाम यांनी सर्व वधू वरांचा निकाह लावून सर्वाँना शुभेच्छा दिल्या. यावेळी वधूवरांसोबत असलेल्या सर्व वऱ्हाड्याच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी सर्व सोहळ्यात समावेश असलेल्या सर्व २१ वधूवरांना कमेटीद्वारा (दहेज) गृहोपयोगी साहित्य देण्यात आले.कमेटीचे अध्यक्ष शेख नूर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत या (इज्तेमाई शादी) मुस्लिम समाजाच्या सामूहिक विवाह साठी गेल्या ४ महिन्यापासून अथक परिश्रम घेतले.
या उपक्रमाचे दरवर्षी असे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करून मुस्लिम समाज बांधवांनी या युवकांना प्रोत्साहित केले.सदर विवाहाच्या यशस्वीतेसाठी कमेटी अध्यक्ष शेख़ नूर क़लन्दर,उपाध्यक्ष शेख आसिफ, साजिद अहमद, शेख अज्जु सरफराज अली, सोहेल शेख, फारुख साबरी, हामिद भाई, इमरान क़ुरैशी, हामिद पठान, नदीम अली, मुनाफ शेख, इरफान शेख, वसीम शेख, सलमान शेख, कलीम शेख, तालिब शेख यांचेसह शहरातील मुस्लिम बांधवांनी योगदान दिले.