मेरा रंग दे बसंती चोला… हसत-हसत फाशीवर चढणाऱ्या शहीद वीरांना भिम टायगर सेने तर्फे अभिवादन
प्रतिनिधी/ वर्धा:
देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या शहिदांना आदरांजली वाहून हा दिवस देशभरात शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. शहीद भगत सिंह यांचा जन्म 27 सप्टेंबर 1907 रोजी झाला.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावणारे स्वातंत्र्य सैनिक शहीद भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती. 23 मार्च आणि हा दिवस इतिहासात या शहिदांच्या नावे कोरला गेलाय. 1931 मध्ये आजच्या दिवशी शहीद भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. ९० वर्षांपूर्वी इंग्रजांनी भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिली.
देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या शहिदांना आदरांजली वाहून हा दिवस देशभरात शहीद दिन म्हणून पाळला जातो. वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये भीम टायगर सेनेचे तर्फे शहीद भगतसिंग यांच्या फोटो समोर मोमबत्ती जाळून त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल रामटेके, विकास झंझाळ, अहमद पठाण, सौरभ हातोले, सोनू सहारे, पलाश, पत्रकार प्रमोद पानबुडे आदींची उपस्थिती होती.