मोकाट फिरणारा जनावरामुळे नागरिक त्रस्त

0

प्रतिनिधी / सेलू :
सेलू परिसरात मोकाट फिरणारा जाणवरा पासून शेतकरी व नागरिक त्रस्त सेलू शहरा मध्ये मोकाट जनावरचे प्रमाण दिवसदिवस वाढत आहे . सेलू शहरालगत असलेल्या शेतातील पीक व गोठयामध्ये बांधून असलेल्या बैलांना शहरात मोकाट फिरणारे जणावरे येऊन टक्कर मारतात त्यामुळे गोठयामध्ये बांधून असलेल्या बैल जखमी होऊन मृत्यू होत आहे. यामुळे शहरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहे. या मोकाट जणावराचा बंदोबस्त करावा याकरिता नगरपंचायत सेलू येथे परिसरातील नागरिकांनी निवेदन दिले आहे. यावेळी
रवींद्र सोनटक्के. संजय धानकुटे. दामोदर भट , संजय खंडाळे. नामदेव सावरकर. शंकर वांदीले. रामाजी टवलारे. राजू आदमने. प्रशांत सावरकर. दामू पोहाणे. पंकज कामडी. रमेश वैरागडे, हमीद पठाण
उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!