‘यांनी त्यांच्या बापालाच विकला, ते आम्हाला बाप चोरणारे म्हणताय’ एकनाथ शिंदे

0

साहसिक न्यूज24
मुंबई: भाजपबरोबर सत्ता स्थापन केल्यानंतर शिंदे गटाचा पहिला दसरा मेळावा आज मुंबईतल्या बीकेसी मैदानावर पार पडतोय. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री विराट जनसमुदायासमोर नतमस्तक झाले. मुख्यमंत्री असलो तरी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे म्हणून मी जनतोसमोर नतमस्तक झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. खरी शिवसेना कुठे आहे याचं उत्तर या जनसागराने दिलं आहे, बाळासाहेबांच्या विचार कुठे आहेत, असा प्रश्ना यापुढे कोण विचार नाही कारण या गर्दीने ते सिद्ध केलं आहे. न्यायालयात जाऊन शिवाजी पार्क मैदान मिळवलं, मी मुख्यमंत्री आहे पण याप्रकरणात हस्तक्षेप करायचा नाही असं मी ठरवलं होतं.
सदा सरवणकर यांनी पहिला अर्ज दिला होता. पण कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी माझी आहे. शिवसेनाप्रमुखांची विचार, शिवसेनाप्रमुखांची भूमिका आमच्या सोबत आहे. बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली. मग सांगा त्या जागेवर उभं राहून बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला आहे का, असा सवाल मुख्यमंत्र्यानी विचारला आहे.
हजारो शिवसैनिकांनी आपला घाम, रक्त सांडून जो पक्ष उभा केला. तो तुम्ही तुमच्या वैयक्तित, राजकीय फायद्यासाठी, महत्वाकांक्षेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे गहाण टाकला. बाळासाहेब रिमोट कंट्रोलने सरकार चालवायचे. तुम्ही तर सरकारचा आणि शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहाण टाकला अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. त्यांच्या तालावर तुम्ही नाचू लागलात आणि आम्हालाही नाचवू लागलात. बाळासाहेबांनी हरामखोर म्हणून ज्या पक्षांचा उल्लेख केला त्या पक्षांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली. हे बघून बाळासाहेबांच्या मनालाही वेदना झाली असेल.
त्यामुळेच आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार जपवणूक करण्यासाठी, हिंदुत्त्वासाठी, या महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही ही भूमिका जाहीरपणे घेतली, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!