यावल तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ कुनल सोनवणे यांच्यकडे नोंदविला निषेध

0

साहसिक न्युज24
यावल जळगाव/ फिरोज तडवी:
यावल तालुक्यातील मालोद व परसाडे येथील ग्रामपंचायत च्या पार पडलेल्या सार्वत्रीक निवडणुकीची मतमोजणी येथील तहसील कार्यालयात सुरू असताना वृत्तांकन करण्यासाठी यावल येथील पत्रकार शेखर पटेल यांनी तहसीलदार महेश पवार यांचे परवानगीने तसेच पोलीस निरीक्षकांनी ही परवानगी दिल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्यांने, खरोखरच साहेबांनी परवानगी दिली आहे का जर दिली नसेल तर तुम्हाला महाग पडेल अशी उर्मट पणेची वागणूक दिल्याने यावल तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने याबाबतचे निवेदन फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे प्रांताधिकारी कैलास कडलक तसेच येथील यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना दिले आहे. तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षकांचे परवानगी नंतरही पोलिसांनी पत्रकारास दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला असुन. तरी वरिष्ठ पातळीवरून सदर प्रकरणी चौकशी करण्यात येईल का खरोखर चौकशी केली असता त्या पोलिस कर्मचाऱ्याला कारवाई होणार का अशी शंका कुशंका निर्माण होत आहे ,या संदर्भातील निवेदन देताना देण्यात आले त्याप्रसंगी पत्रकार संघ शहराध्यक्ष सुरेश पाटील ,अय्युब जी पटेल, डी, बी.पाटील, शेखर पटेल , भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या ग्रामीण क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष प्रकाश चौधरी, सुनिल गावडे , तेजस यावलकर ,पराग सराफ , विकी वानखडे, दीपक नेवे, समाधान पाटील , फिरोज तडवी , ज्ञानेश्र्वर मराठे ,वासूदेव सरोदे ,योगेश सोनवणे, समीर तडवी , निलेश पाटील यांचे सह पत्रकार बांधव याप्रसंगी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!