रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे,इंद्रकुमार सराफ,लोकनेते प्रा. सुरेश देशमुख अमृत महोत्सवानिमित्त रक्तदान शिबीर.
लोकनेते प्रा. सुरेश देशमुख अमृत महोत्सवानिमित्त रक्तदान शिबीर
वर्धा : ‘रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. रक्तदान करण्याचा उपक्रम प्रशंसनीय असून प्रेरणादायक आहे, असे प्रतिपादन स्थानिक यशवंत महाविद्यालयात आयोजित माजी आमदार सुरेशभाऊ देशमुख यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘रक्तदान शिबिराच्या’ उदघाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष इंद्रकुमार सराफ यांनी 13 ऑक्टोबर रोजी केले.
या प्रसंगी अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा यशवंत संस्थेचे माजी अध्यक्ष प्रा.सुरेशभाऊ देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून मकरंद पाठक, उदघाटक इंद्रकुमार सराफ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, महोत्सवाचे स्थानिक अध्यक्ष समितीचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ विलास देशमुख, यशवंत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ रविंद्र बेले, माजी प्राचार्य डॉ. विजय बोबडे, डाॅ. विरेंद्र बैस, प्रभारी प्राचार्य डॉ. प्रभाकर ढाले व एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.
रक्तदान शिबीरात यशवंत महाविद्यालय वर्धा व एस.एस.एन.जे.महाविद्यालय, देवळी येथील 50 एन.सी.सी.छात्र सैनिक व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांसह यशवंत संस्थेअंतर्गत शाळेतील शिक्षकांनी सहभागी होऊन रक्तदान केले व आपली सामाजिक बांधिलकी जपली.
स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्त संकलन अधिकारी डाॅ. श्वेता भिसेन, जनसंपर्क अधिकारी प्रवीण गावंडे, हनुमंत गाणार व उज्ज्वला लामसोगे यांनी रक्तदान शिबीराचे संचालन केले.
डाॅ. के. पी. निबांळकर, प्रा. डी. बी. भोयर, प्रा दिलीप देशमुख, यशवंत विद्यालय नाचणगावचे पर्यवेक्षक मानिक सिगंन, प्रा. रितेश निमसडे,
डाॅ. नरेश खोडे, डाॅ. नरेश कवाडे, डाॅ. कल्पना कुलकर्णी, डाॅ. आरती चौधरी, डा सरिता विश्वकर्मा, डाॅ. दिपक महाजन व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
संचालन प्रा प्रमोद नारायणे यानी तर आभार एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन राहुल भालेकर यांनी मानले.
यशस्वीतेकरीता एन.सी.सी.छात्र सैनिकांनी अथक परिश्रम घेतले.
अविनाश नागदेवे सहासिक न्यूज-24