देवळी /तालुक्यातील रत्नापूर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी रत्नापूर ग्रामपंचायतचे सरपंच सुधीर बोबडे व उपसरपंच सौरव कडू यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सरपंच सुधीर बोबडे ,उपसरपंच सौरभ कडू, ग्रा.पं. सदस्य देविदास वाघ, ग्रा.पं. सदस्य सुनिता सडमाके ,ग्रा.पं. सचिव वर्षा खंडेराव ,कुणाल सावंकार ,कुंडलिक तुरक ,पंढरी काळे, शिपाई श्रावण मडावी तसेच गावातील मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.