रस्ता सुरक्षा अभियान -२०२४ अतंर्गत जिल्हास्तरीय पोस्टर स्पर्धेत लोकमान्य विद्यालय आष्टी च्या विद्यार्थींचे घवघवीत यश..

0

आष्टी (शहिद)/लोकमान्य विद्यालय आष्टी यांनी यशाची परंपरा कायम ठेवली.मुलांना यशस्वी करण्यासाठी येथील शिक्षक सदैव प्रयत्नशील असतात.५ फेब्रुवारी -२०२४ ला घेण्यात आलेली रस्ता सुरक्षा अभियान २०२४ अंतर्गत जिल्हास्तावरील चित्रकला पोस्टर स्पर्धेमध्ये ३ गटातून लोकमान्य विद्यालय आष्टी येथील ( ५ ते ७ ) गटातून आर्यन अर्पण तुपकर, कु. वेदिका विकास भोयर ( ८ ते १० ) गटातून कु.देवांशी पंकज मांडवगणे, कु.धनश्री नरेश ठाकरे तर (११ ते १२ ) गटातून कु.प्रतीक्षा चांबटकर हे विद्यार्थी बक्षीस पात्र ठरलेले आहे.या यशस्वी विद्यार्थ्यांचा आज विकास भवन,वर्धा येथे मा.उषाताई तळवेकर मॅडम उपशिक्षणाधिकारी मा.विवेक देशमुख सर वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश वर्धा व मा.समीर शेख सर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या हस्ते भव्य दिव्य सत्कार घेण्यात आला.या विद्यार्थीनींनी आपल्या यशाचे श्रेय कलाशिक्षक गोवर्धन इंगळकर,सुनील डांगे,अर्पण तुपकर सर यांना दिले आहे.लोकमान्य विद्यालयचे मुख्याध्यापक विजय दाभाडे,उपमुख्याध्यापक नारायण वरकड,पर्यवेक्षिका संगीता खोंडे मॅडम तसेच संस्थेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता, सचिव उमेश देशपांडे,यांच्या तर्फे यश प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन.तसेच लोकमान्य विद्यालय परिवारा तर्फे सुध्दा यशस्वी विद्यार्थींचे अभिनंदन केले.

नरेश भार्गव साहसिक न्यूज /24 आष्टी (शहीद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!