राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पधेत बुलढाणा मुलींच्या संघाला सुवर्णपदक..

0

सोनल खर्चे व पलक परदेशी याची महाराष्ट्र संघात निवड

मलकापूर :- महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन व गोंदिया जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनचेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल गोडीया येथे १० वी महाराष्ट्र सबज्युनिअर राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन दि २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले होते सदर राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण बावीस जिल्हाच्या ३६ संघाचा सहभाग घेतला असून बुलढाणा जिल्ह्य संघात स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरच्या खेळाडूंनी सहभाग घेतला असून बुलढाणा जिल्ह्याच्या मुलींच्या संघाने सुवर्णपदक पटकाविले बुलढाणा संघाने राज्यस्तरावर अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या बुलढाणा जिल्ह्याचा धबधबा कायम ठेवत राज्य स्पर्धेवर बुलढाणा जिल्ह्यात संघाचे वर्चस्व कायम ठेवले असून गत महिन्यात लातूर येथे ज्यूनियर राज्यस्तरीय अजिंक्यपट स्पर्धेत मुलींच्या सर्व खेळाडूंना सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव विजय पळसकर यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभत आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या मुलींच्या संघाने अहमदनगर रायगड संघाचा नमवून सेमी फायनल मध्ये वाशिम संघाचा धुवा उडवीत अंतिम फेरी सोलापूर संघासोबत अत्यंत चुरशीच्या सामन्यात जिल्हा संघाचा सुवर्णपदक पटकाविले बुलढाणा जिल्ह्याच्या मुलीच्या संघात कु देवश्री जगताप कर्णधार कु जानवी खर्चे कु पलक परदेशी कु भक्ती क्षीरसागर कु विधी वर्मा कु श्रावणी कळवले कु सयुक्ता पवार प्रशिक्षक संदीप क्षीरसागर व्यवस्थापक श्रुष्टी होले यांचा समावेश होता. तसेच सिगल मुलींच्या स्पर्धेत पलक परदेशी ने रजतपदक तर सोनल खर्चेने कांस्यपदक पटकवीत महाराष्ट्र संघात निवड झाली. वैयक्तिक डबल्स मुलीच्या संघात देवश्री जगताप व भक्ती क्षीरसागर यांनी रजतपदक तसेच सोनल खर्चे व पलक परदेशी यांनी कांस्यपदक मुलांच्या वैयक्तिक डबल्स मध्ये सार्थक जोगदंड व कार्तिक कुदळे यांनी रजतपदक तसेच मिस्क डबल्स मध्ये तनिस तायडे व सोनल खर्चे यांनी कांस्यपदक पटकवीत बुलढाणा जिल्हा संघाचा राज्य स्पर्धेत नावलौकिक वाढविला.
मुलींच्या संघाने सुवर्णपदक व मुलाच्या संघाने कांस्यपदक पटकाविल्याबद्दल मलकापूर मतदारसंघाचे मा आ राजेशभाऊ एकडे महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष श्री सुनीलजी पूर्णपात्रे सचिव रवींद्र सोनावणे उपाध्यक्ष दीपक आर्डे सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशन बुलढाणाचे अध्यक्ष संतोष बोरगांवकर कार्यध्यक्ष राजेश महाजन विजयराव जाधव जिल्हाक्रिडा अधिकारी महानकर साहेब लक्ष्मीशंकर यादव तालुका क्रीडा अधिकारी चंद्रकांत साळुंखे आदींनी सर्व खेळाडूंचे मनापासून अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सागर राऊत साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!