रात्रीच्या सुमारास घरावर शसस्त्र हल्ला,नालवाडी येथील घटना :
शेजारी राहनाऱ्यांमूळे कुटूंब थोडक्यात बचावले
वर्धा : कृषि विभाग कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत झालेला पराभव आणि त्यात मागील संचालक मंडळाने केलेल्या भ्रष्टाच्याराची पोलखोल केल्याचा राग मनात धरुन येथील नवनियूक्त कृषि पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत भोयर यांच्या घरावर जीव मारण्याच्या उद्देशाने गुंडाच्या मदतीने शसस्त्र हल्ला केल्याची घटना रविवार १ आक्टोंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास नालवाडी परिसरात घडली.या हल्ल्यात भोयर यांचे कुटूंब थोडक्यात बचावले असले तरी या घटनेे सर्व परिसरात दहशत पसरलेली आहे.
काही दिवसापूर्वी येथील कृषि विभाग कर्मचारी पतसंस्थेची निवडणुक पार पडली यात प्रशांत भोयर यांच्या गटाने १५ पैकी पंधरा जागा जिंकत बहुमत मिळवत निवडणुक जिंकली.विरोधी पक्षाला हा पराभव जिव्हारी लागला आणि त्यांनी भोयर यांना धमकवण्याचा प्रयत्न केला.मात्र भोयर यांनी पतसंस्थेत मागील संचालक मंडळाने केलेला भ्रष्टाचार बाहेर काढण्यास सुरवात केली. त्यामुळे पित्त खवळलेल्या विशाल बीरे नामक व्यक्तीने भोयर यांना जीवे मारण्याच्या हेतूने रात्रीच्या सुमारास गुंडांच्या मदतीने रात्रीच्या सुमारास त्यांच्या घरावर हल्ला चढविला.
यावेळी त्यांचे कुटूंबीय पत्नी,वडील, दोन लहान मुले घरी होती.हल्ला होताच भोयर यांच्या पत्नीने दाराची कडी आतमधून लावून घेतली.मात्र जीवे मारण्याच्या उद्देशाने आलेल्या गुंडांनी कंपाउंडवरुन आतमध्ये शीरत दाराला मोठमोठ्या दगडाने ठोकुण दार तोडण्याचा प्रयत्न केला.काही काळ हा थरार सुरुच होता.त्यानंतर परिसरातील नागरीक एकत्र आल्याने हे गुड तिथून निघून गेल्याने भोयर यांचे कुटूंब थोडक्यातळ बचावले.
गंभीर स्वरुपाचा गुन्हा नोंद अदखलपात्र…
रात्रीच्या सुमारास गुडांच्या मदतीने चारचाकी वाहनात येत घरावर शसस्त्र हल्ला चढिण्यात आला.या घटनेची तक्रार भोयर यांनी रात्री शहर पोलिस ठाण्यात दिली.मात्र या गंभीर गुन्ह्याची नोंद पोलिसांनी अदखलपात्र अशी घेतली या प्रकाराने परिसरातील सर्वांचेच डोळे वटारले.जीव गेल्यावरच गुन्हा दाखल होतो का असा सवाल यावेळी उपस्थितांकडून विचारण्यात येत होता.
गुन्हेगारांचे मनोबल वाढण्यास मदत….
सात लोकांच्या टोळीने जीवे मारण्याच्या उद्देशाने रात्रीच्या सुमारास घरावर शसस्त्र हल्ला चढवला यावेळी सर्व कुटूंब लहान मुलांसह घरीच होते. आतून दरवाजा बंद झाला नसता तर कदाचीत मारेकऱ्यांचा उद्देश पुर्ण झाला असता.असे असतानाही पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतली.यामुळे गुन्हेगारांना कोणतीच शिक्षा होणार नाही बऱ्याच घटनेत असे होत असल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढण्यास मदत होत आहे.
सागर झोरे सहासिक न्यूज-24