रामनगरातील ‘दिनेश’करतो दारू विकून लोकांचे संसार उद्ध्वस्त
साहसिक न्यूज 24:
प्रतीनिधी / वर्धा :
वर्ध्यातील जवळपास सर्वच वार्डामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शुभ आशीर्वादाने व पोलिस प्रशासनाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षणामुळे दारूचा महापूर वाहत आहे.
शहरातील रामनगर येथे देशी , विदेशी दारूचा बनावट कारखानाच आहे. यामुळे या ठिकाणी सर्वात जास्त महापूर पाहावयास मिळत आहे. दारूबंदी विभागासह आणि स्थानिक पोलिस प्रशासनासह याबाबत सविस्तर माहिती असून देखील या कारखान्यावर आज पर्यंत मोठी कारवाही करताना दिसत नाही. बनावट अवैध दारूचे माहेर घर अशी ओळखच निर्माण झाली आहे. रामनगरातील दिनेश ठा… याने तर त्याच्या अवैध बनावट दारूच्या अड्ड्यांवर सी सी टीव्ही क्यॅमेरे लावले आहेत. रामनगरातील हा ‘दिनेश’ पोलिसांना खोट्या गुन्ह्यामध्ये फसवण्याच्या धमक्या देत असतो. यामुळे याच्या बनावट दारू अड्ड्यांवर जाण्यास पोलिस सुद्धा हिम्मत करीत नाही.
यामुळे या दिनेशची ‘हिम्मत’ वाढली असल्याने याच्या या देशी , विदेशी बनावट दारुमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत . तर अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे. परिसरातील नव युवक विद्यार्थ्यांना सहजरीत्या मिळणाऱ्या दारूच्या घोटाची चटक लागली आहे. यामुळे नव पीढी व्यसनाधीन होत चालली आहे. यामुळे या भागात दारू पीवून या दारूड्याची हाणामारी , धिंगाणा घालत असल्याने कायदा सुव्यवस्थेतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दारूविक्रेत्यावर जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांनी कार्यवाही करून हा अवैध दारू अड्डा बंद करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.