रेती तस्करांवर दणका- ठाणेदराची प्रथम कारवाई…

0

देवळी / येथील ठाणेदार मनोज वाडीवे यांनी देवळी पोलीस स्टेशनला रुजू होताच अवैद्य धंदे व रेती तस्करांवर बडगा उगारला असून छापे व धाडसत्र सुरू केले आहे.त्यांनी नुकतेच रेती तस्करांवर कारवाईला सुरुवात केली असून यशोदा नदीवर अवैधरित्या रेती भरत असताना ट्रॅक्टर पकडण्यात आला असून त्याच्यावर योग्य ते रीत्या कारवाई करण्यात आली आहे.ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३२ टी सि ०२५ व ट्रॉली क्रमांक एम एच ३२ टी सि ०२६, जप्त करण्यात आला ट्रॅक्टर ट्रॉली व रेती असा एकूण ९ लाख ५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.असून चालक अजय दौलतराव टेकाम वय २० वर्ष राहणार पाचगाव पुनर्वसन देवळी,यांच्यावर कारवाई करण्यात आली असून ट्रॅक्टर मालक सुनील दादाजी ढोक वय ६० वर्ष रा.देवळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.ही कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक नुरल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मनोज वाडिवे सोबत पोलीस कॉन्स्टेबल मनोज नपटे, गणेश इंगळे,नितीन तोडासे,यांनी कार्यवाही केली पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.

 

सागर झोरे साहसिक न्यूज /24 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!