रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिक त्रस्त.
देवळी : मागील कित्येक दिवसापासून वर्धा ते नांदेड या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे आणि मुख्यता देवळी शहरांमध्ये देवळी, सेलसूरा आणि देवळी जवळ यशोदा नदीकाठी अंदोरी मार्गावर रेल्वे पूल व लोहमार्गाचे काम सुरू आहे .परंतु सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे या दोन्ही ठिकाणी चीखलमय रस्ते निर्माण झालेले आहे .त्यामुळे देवळी ते अंदोरी मार्गावर आठ ते दहा गावे बसलेले आहे. त्यामुळे या ग्रामीण भागातील नागरिकांना दररोज देवळी, वर्धा तसेच अन्य शहरी भागात आपल्या कामानिमित्त दररोज ये जा करावी लागते परंतु चिखलमय झाल्याने अनेक दुचाकी वाहने येथे अपघात ग्रस्त होऊन अनेक नागरिक येथे जखमी झालेले आहे. या भागातील अनेक नागरिकांनी त्या ठिकाणच्या रेल्वे प्रशासनाकडे तोंडी तक्रार अनेक वेळा दिली तरीही हा चिखलमय खड्डे पडलेला रस्ता भर पावसाळ्यात सुद्धा दुरुस्त करण्यात येत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे.
तसेच देवळी सेलसुरा लोहमार्गवर फाटक व पुलाचे काम सुरू आहे. हा मोठा हायवे आहे नागपूर , यवतमाळ या हायवेवरून मोठी वाहक होते. वाहनाची असंख्य वाहनांची इथून येत, जात असते. तरीही रेल्वे प्रशासनाने दोन रुळांमध्ये अस्त व्यस्त भर घातली आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनधारक येथे अपघात होऊन जखमी झाले. तरीही रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देत नाही .दिवसेंदिवस येथे अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल दखल घेऊन त्त्वरित देवळी शहराच्या दोन्ही बाजूला रस्त्याचे काम सुरळीत करावे अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहे.
सागर झोरे सहासिक न्यूज -24