लाचखोर एएसआय भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात.
साहसिक न्यूज 24
प्रतिनिधी /देवळी :
देवळी शहरात मंगळवारी रात्री 7 ते 8 च्या दरम्यान देवळी पोलीस स्टेशनच्या परिसरातील हनुमान मंदिर जवळ लाचलुचपत प्रतिबंधक नागपूर यांच्या चमूने देवळी पोलीस स्टेशन मधील कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक(ए एस आय) सुधीर बापुराव मेंढे वय 55 यांना तीन हजार रुपयाची लाच स्वीकारताना नागपूर येथील लाच लुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रंगेहात लाच स्वीकारतांना अटक केली त्यामुळे संपूर्ण पोलीस स्टेशन व परिसरात ऐकच खळबळ उडाली त्यामुळे पोलीस स्टेशन समोर लोकांची गर्दी जमा झाली होती.लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत विविध कलमे नुसार कारवाई करून सुधीर मेंढे यांना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार पाच-सहा दिवस आगोदर अक्षय इंगोले राहणार नांदोरा(डफरे)याचा वाद गावातील केशव एकनाथ डफरे याच्या सोबत झाला होता या वादावादीत केशव डफरे ने अक्षय इंगोलेला ब्लेट च्या पत्याने मारून जखमी केले होते याची तक्रार अक्षय इंगोले ने देवळी पोलीस स्टेशनला केली होती देवळी पोलीस स्टेशने अक्षय इंगोले यांच्या तक्रारीवरून विविध कलमे अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली होती.परंतु सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर मेंढे यांनी केशव डफरे ची बाजू घेऊन अक्षय इंगोले यांच्यावर दबाव आणून समोरील व्यक्तीस अटक करतो मला पाच हजार रुपये दे असे सांगितले पैसे न दिल्यास अक्षय इंगोले ला शिवीगाळ करून दम भरला त्यामुळे अक्षय इंगोले न्याय मागण्यासाठी वर्धा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे धाव घेतली होती.परंतु त्यानंतर सुधीर मेंढे नी अक्षय इंगोले ला धमकावून तुझ्यावर पण गुन्हा दाखल करतो नाहीतर मला पाच हजार रुपयाची मागणी केली होती परंतु अक्षय इंगोलेंनी मी तीन हजार रुपये देतो व माझ्यावर गुन्हा दाखल करू नका असे सांगून थेट लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय नागपूर यांच्याशी थेट संपर्क साधून झालेल्या घटनेचा सविस्तर प्रकरण सांगून सुधीर मेंढे यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली.त्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुधीर मेंढे यांना अक्षय इंगोले कडून तीन हजार रुपयाची लाच स्वीकारताना देवळी पोलीस स्टेशनच्या परिसरामधील रंगेहात पकडले.
काही दिवसापासून देवळी पोलीस स्टेशन मध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण भरपूर वाढले होते.या भ्रष्ट कारभारामुळे देवळी परिसरातील जनता त्रस्त झाली होती.त्याचाच हा परिणाम मंगळवारी रात्रीच्या सुमारास सुधीर मेंढे यांना लाच स्वीकारताना अटक झाली.आणि या प्रकरणाची माहिती देण्यास देवळी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक नंदकिशोर खेकडे यांनी माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला माझ्या हाती माहिती देण्याचा अधिकार नाही त्यामुळे मी तुम्हाला माहिती देऊ शकत नाही हा देवळी पोलीस स्टेशनचा लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई दाबण्याचा असफल प्रयत्न देवळी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक नंदकिशोर खेकडे यांनी केला आहे. ही अत्यंत शरमेची बाब आहे. उपनिरीक्षक खेकडे यांनी यापूर्वीही अनेक प्रकरणात माहिती देण्याची टाळाटाळ केली त्यांच्या या मानसिकतेमुळे त्यांच्यावर पोलीस विभागाने दखल घ्यावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.