लालपरीची दुचाकीला धडक; दोन दोन जागीच ठार

0

साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्ध:
वेगात असलेल्या एसटी बस समोर आलेल्या दुचाकीला जोरदार धडक लागली त्यात एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील पांडे पेट्रोल पंप जवळ घडली.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस एम एच 13 सी यु 8332 क्रमांकाची गाडी शेगाव वरुन ब्रह्मपुरी कडे जात होती.
येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ एसटी बस च्या समोर एम एच 31 / 5798 क्रमांकाची मोटरसायकल विरुद्ध दिशेने पेट्रोल भरण्यासाठी वळवली . मागून वेगात आलेल्या एसटी बसने त्या मोटर सायकल ला जबर धडक दिली .त्यात रामदास देवाची भलावी (70) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला .तसेच प्रल्हाद देवराव यूनाते (40) यांचा कारंजा ग्रामीण रुग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दोघेही कारंजा कृषी अधिकार्‍याकडे संत्राचे परमिट घेण्याकरिता आले असल्याची माहिती मिळाली आहे. हे कारंजा तालुक्यातील मेठहिरजी येथील रहिवासी होते.

आणखी किती बळी घेणार……..?

कारंजा येथून एक किलोमीटर असलेल्या पेट्रोल पंपावर दररोज अनेक नागरिक पेट्रोल भरण्यासाठी विरुद्ध दिशेने मोटर सायकल टाकतात .कारंजा येथील ओरिएंटल टोल प्लाझा यांनी या ठिकाणी मोठे मोठे दगड ठेवून हा रस्ता बंद केला होता .तालुक्यातील काही अतिउत्साही नागरिकांनी तेथील एक दगड त्या जागेवर हटविलेत.
त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे येथे अनेक घटना घडल्या आहे .येथे ओरिएन्टल पाथ वेजने कायम स्वरूपी दुभाजक लावण्याची नागरिकांची मागणी आहे
या राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोल भरण्यासाठी शॉर्टकट रस्ता म्हणून या ठिकाणचा उपयोग करतात व अप्रिय घटनांना निमंत्रण देतात या घटना टाळण्या करिता तातडीची उपयोजना करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!