लिंगापुर येथील प्राथमिक शाळेच्या परसबागेला तालुकास्तरीर “प्रथम” क्रमांक प्राप्त.

0

 सरपंचाने केली लिंगापुर येथील परसबागेची पाहणी

पंचक्रोशीतील अनेक शेतकरी येतात दररोज परसबाग पाहणीसाठी

आष्टी (शहीद) : तालुक्यातील नजिकच्या लहान आर्वी ग्रामपंचायत कक्षेतील गटग्राम लिंगापुर येथील जि. प.प्राथमिक शाळेत विदयार्थी,पालक आणि शिक्षक यांचे परीश्रमातून मा.प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान अन्तर्गत सुन्दर परसबाग तयार करण्यात आली असून सदर परसबागेत पालक, मेथी ,कोथिंबिर ,वांगी ,टमाटर, मुळा ,लवकी ,गाजर ,काकडी, फुलकोबी, मिरची अशा एकुण २१ प्रकारच्या देशी वाणाची परसबागेत लागवड करण्यात आली. सर्व प्रकारच्या भाज्यांचा उपयोग शालेय पोषण आहारात करण्यात येत असल्या मुळे मुलाना विषमुक्त भाजिपाला उपलब्ध होण्यास मदत होत आहे.या उपक्रमा मुळे मुलांना नैसर्गिक शेतीचे धडे मिळत असून शेती विषयक नव नविन तंत्राची माहिती मिळत आहे.या परसबागेला तालुकास्तरीर प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याने सदर परसबागेच्या उपक्रमाची परीसरात चर्चा होत असून पंचक्रोशीतील स्थनिक शेतकरी वर्ग सदर परसबाग पाहण्या साठी शाळेत दररोज येत असल्याचे दिसून येत आहे.याच अनुषंगाने लहान आर्वी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सुनिल साबळे यांनी सुध्दा लिंगापुर येथील प्राथमिक शाळेत येऊन परसबागेची पाहणी केली.परसबाग उपक्रमात आष्टी तालुक्यात लिंगापूर शाळेने प्रथम क्रमांक पटकावीला असल्याने शाळेतील मुख्याध्यापक निलेश इंगळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. लिंगापुर येथील शाळेची परसबाग पाहणी केल्यानंतर सरपंच सुनिल साबळे यांनी वरीष्ठ अधिकार्यांशी परसबागे विषयी भ्रमणध्वनीवरून चर्चा सुध्दा केली.
परसबाग पाहणीवेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा तथा ग्रामपंचायत सदस्यां भाग्यश्री निंभोरकर,ग्रामपंचायत सदस्यां कांता इंगोले,शाळा व्यवस्थापन समिती सदस्या कविता शेंडे आणि ज्योती गोडबोले,शाळेचे मुख्याध्यापक निलेश इंगळे आदी उपस्थित होते.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यांनी नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सुनिल साबळे यांनी शाळेत प्रथमच भेट दिली असल्याने नैसर्गिक पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन व स्वागत केले.तर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या भाग्यश्री निंभोरकर यांची शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी निवड झाल्याने ग्रामपंचायतचे वतीने सरपंच सुनील साबळे यांनी सुध्दा त्यांचे अभिनंदनपर स्वगत करण्यात केले.तालुक्यातुन परसबागेला प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याने शाळेच्या यशाबद्दल सरपंच सुनिल साबळे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.भाग्यश्री निंभोरकर ,पोलिस पाटील विक्रम निंभोरकर , ग्रामपंचायत सदस्यां कांताबाई इंगोले , मारोतराव उईके तसेच गटशिक्षणाधिकारी प्रमोद देशपांडे तसेच लिंगापुर गावातील सर्व नागरीकांनी शाळेचे मुख्याध्यापक निलेश प्र.इंगळे आणि शाळेतील मुलांचे व सर्व पालकांचे अभीनंदन केले.

गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!