वंचित च्या बाईक रॅलीने दुमदुमले हिंगणघाट……

0

आंबेडकरांच्या सभेसाठी केली प्रचंड वातावरण निर्मिती.

हिंगणघाट / येथे १७ फेब्रु.ला वंचित बहुजन आघाडी, तालुका व शहर हिंगणघाट तर्फे प्रकाश आंबेडकरांच्या वर्धा येथे रविवार दिनांक 18 फेब्रु.ला होणाऱ्या महाएल्गार सभेच्या प्रचारासाठी हिंगणघाट शहरातून प्रचंड बाईक रॅली काढण्यात आली. “महाएल्गार सभा,चलो वर्धा,” “बाळासाहेब आंबेडकर आगे बढो “, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ” इ. घोषणा देत ही रॅली शहरातून मार्गक्रमण करीत होती,याने हिंगणघाट शहर दूमदूमून गेले.नंदोरी चौक येथे हिरवी झेंडी दाखवून पूर्व विदर्भ समन्वयक किशोर खैरकर यांनी रॅली ला सुरुवात करून दिली. याप्रसंगी जिल्हाप्रभारी बंडूभाऊ नगराळे,जेष्ठ नेते अशोक रामटेके, माजी जिल्हाउपाध्यक्ष कुणाल वासेकर,समुद्रपूर तालुकाध्यक्ष राजू धाबर्डे, महासचिव पंकज भगत इ. प्रमुख्याने उपस्थित होते.हिंगणघाट तालुकाध्यक्ष विवेक कांबळे व शहर अध्यक्ष रवि कांबळे यांचे नेतृत्वात निघालेली ही बाईक रॅली शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करीत डॉ. आंबेडकर यांचे पुतळ्याजवळ पोहोचली. येथेच रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीचे नियोजन विवेक कांबळे व रवि भाऊ कांबळे यांनी केले, त्याचे सर्वांनी कौतूक केले . या रॅलीने शहरात महाएल्गार सभेची जोरदार चर्चा सुरु आहे.सदर रॅली मध्ये रवि सोणकुसरे, प्रशांत मांडवे, संदीप मून, अजय डांगरे, आशू भगत रींकु भालेराव विक्की गायकवाड,अंकुश तीरमारे सिद्धार्थ जमनकर, स्वप्नील येसंबरे ,सागर भजभूजे, मंगेश मानवटकर,प्रज्वल पाणबुडे, अक्षय कांबळे, निर्धार शिरसाट, अतुल मेंढे, शैलेश मेंढे,बंटी मेंढे, निकेश मून , वंश मून, सुमित थूल, देवानंद लीहितकर,विलास पोपटकर, भोजाजी पाटील, इत्यादी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज /24 हिंगणघाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!