वढोदा वनविभागाच्या हद्दीतून जेसीबीच्या साह्याने शेत रस्ता तयार करीत असताना शेतकरी व जेसीबी चालक विरुद्ध गुन्हा दाखल
Byसाहसिक न्युज 24
मुक्ताईनगर : पंकज तायडे
वनपरिक्षेत्र वडोदा येथील वनपरिक्षेत्र हद्दीत शेत रस्ता तयार करीत असत्ताना शेतकरी व जेसीबी चालका विरुद्ध गुन्हा दाखल करीत जेसीबी जप्त करण्यात आली
वढोदा वनपरिक्षेत्राचे अधिकारी व वन कर्मचारी यांचेसह दिनांक 29.रोजी रात्री गस्तीवर असतांना नियतक्षेत्र- द. कंपार्टमेंट क्र 515 मध्ये डोलारखेडा येथे जंगलामध्ये अनाधुकृतपणे संख्या ( 1) JCB मशीन च्यासाह्यानेशेतात जाण्याकरीता नवीन रस्त्ता बनवित असताना प्रोसपिस वृक्ष नष्टकरत असल्याचे दिसून येताच गस्तीवर असलेले कर्मचारी यांनी मौक्यावर जेसीबी जप्त करीत शेतकरी कडू रामू पाटील रा सुकळी ,जेसीबी चालक गोविंदा एकनाथ पाटील रा मेळसंगावे यांच्या वर कार्यवाही करून वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.