वर्धात पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या साखळी उपोषणाच्या 171 व्या दिवशी बसल्या रमाईच्या चीमुकल्या लेकी बसल्या उपोषणाला
प्रतिनिधी/ वर्धा ;
शासन व सुप्रीम कोर्ट ऐतिहासिक स्थळांची जपवणूक व देखभाल करण्यासाठी प्रशासनाला आदेश देते परंतु संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर्धा शहरातील पुतळ्याला पन्नास वर्षे उलटून गेली अशा केंद्र बिंदू असलेल्या तसेच ऐतिहासिक धरोहराच्या परिसराचे,जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशासनाद्वारे,पोलिस वेल्फेअरच्या मालकीचा पेट्रोल पंप उभारून विद्रुपीकरण केल्या जात आहे.खासदार रामदास तडस,पालकमंत्री सुनिल केदार,आमदार रणजित कांबळे,डा.पंकज भोयर,समीर कुनावार,दादाराव केचे यांनी राज्य सरकारला पेट्रोल पंप हटविण्याचे निर्देश द्यावे.अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा साखळी उपोषणाच्या 171 व्या दिवशी साखळी उपोषणातुन भीम टायगर सेनेचे वर्धा जिल्हा प्रमुख विशाल रामटेके दिला .
संविधान निर्माते डा.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पोलिस प्रशासन-वेल्फेअरच्या पेट्रोल पंपची जागा स्थलांतरित करण्यात यावी या मागणीसाठी,कृती समितीच्या वतीने आज 4 मार्च 2022 शुक्रवार ला बनते धम्मज्योती यांच्या मार्गदर्शनात भीम टायगर सेनेच्या सौरभ हातोले, रवींद्र चाटे,सोनू सहारे,सिद्धार्थ मेश्राम, विशाल नगराळे,संजय कांबळे,स्वप्नील गोटे,सिद्धार्थ मून,विकी पाटील,पवन धवणे आदी पदाधिकारी कार्यकर्त्यानी साखळी उपोषण करून राज्य व केंद्र सरकार, पालकमंत्री,स्थानिक जिल्ह्यातील काँग्रेस-भाजप आमदार,खासदार,जिल्हाधिकारी-जिल्हा पोलिस अधिक्षक आणि प्रशासनाच्या विरोधात तीव्र निषेध नोंदवला आहे.पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या साखळी उपोषणाचा 171 वा दिवस असुन गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील आंबेडकरी व पुरोगामी संघटना यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सिव्हिल लाइन वर्धा येथे तीव्र आंदोलन सुरु असुन सरकार व प्रशासन सुस्त दिसुन येत आहे.
विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये रमाबाई च्या लेकी ज्यांना आपण म्हणतो या चिमुकल्या मध्ये अकरा वर्षीय मिस्ती विशाल रामटेके , सिद्धी विकास जंजाळ तर चार वर्षीय साची विशाल रामटेके या तिघीही आज दिवसभर उपोषणाला बसल्याने उपोषण कर्त्या महिला व पुरुषांचे त्यांना बघून डोळे पाणावले यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीने मिस्ती रामटेके या चिमुकलीला विचारणा केली की हे तुझे शिक्षण घेण्याचे आहेत उपोषणाला का बसल्यात यावेळी मिस्ती नी
सांगितले की बाबासाहेबांचा चळवळीचा कारवा समोर नेण्याकरिता व बाबासाहेबांनी जे आम्हाला अधिकार , हक्क दिले त्या अधिकारांसाठी व न्यायासाठी व बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्यात करिता मी माझ्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक चळवळीचे काम करीत आहे . हे राजकारण नसून हे एक सामाजिक चळवळ आहे . बाबासाहेबांच्या चळवळीचे काम पुढे नेण्याचे शिक्षण माझ्या परिवारातील माझे आई-वडील आजी व इतर नातेवाईकांनी सुद्धा या चळवळींमध्ये सहभाग घेण्यासाठी मला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यामुळेच मी आज या साखळी उपोषणाला बसून बाबासाहेबांची चळवळ समजण्याचा प्रयत्न करीत आहे असेही आमच्या प्रतिनिधीला मिस्ती रामटेके या चिमुकलीने सांगितले .