वर्धा जिल्ह्यातील युवा कार्यकर्ते आशिष सोनटक्के यांना दलित पॅंथर पुरस्काराने सन्मानित
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
नांदेड नंतर नुकतेच दीक्षाभूमी नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे दिनांक 29/ 10/ 2022 रोजी दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव वर्ष 1972 ते 2022 या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संस्थापक अध्यक्ष माननीय प्रफुल जी शेंडे भीम आर्मी सविधान रक्षक दल तर दलित पॅंथर संस्थापक ज. व्ही.पवार ,मुंबई राजेंद्र गौतम दिल्ली ,नागपूर श्रावण गायकवाड औरंगाबाद, व छायाताई खोब्रागडे नागपूर ,हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10:00 पासून करण्यात आली. सर्वप्रथम महामानवाच्या फोटोला माल्यार्पण करण्यात आले कार्यक्रम हा चार सत्रा मध्ये पार पाडण्यात आले त्यातही अनेक नामवंत जसे की कवी लोकनाथ यशवंत ,कवी प्रोफेसर राजेंद्र गोलारकर, कवी वनश्री बनकर, कवी राजेंद्र गवळी ,त्याचबरोबर प्रमुख वक्ते प्रशांत कनोजिया दिल्ली, प्रो. दिलीप चव्हाण नांदेड ,शाम मीरा सिंग दिल्ली, हे सुद्धा आकर्षण मार्गदर्शन ठरले तर त्याच कार्यक्रमात तिसरे सत्र म्हणून शैलेश नखाडे याचे लिखित एकांकी नाटक ही आकर्षण ठरले चौथ्या सत्रात अनेक दिग्गजांना पुरस्कार देण्यात आला व त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ अध्यक्ष पदावर कार्यरत असलेले आशिष सोनटक्के यांची जिल्हातील निस्वार्थपणे फुले शाहू आंबेडकर चळवळीतील चालू असलेल्या कामाची दखल घेत यांना देखील दलित पॅंथ संस्थापक अध्यक्ष मा.ज.व्ही. पवार यांच्या हस्ते गोल्डन जुबली सेलिब्रेशन चे मान सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले तेव्हा आशिष सोनटक्के हे म्हणाले की हा सन्मान माझा नसून माझ्या सर्व सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांचा असून कामाची दखल घेत सामान्य कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या माननीय प्रफुल भाऊ शिंदे यांचा देखील असून यांनी सामान्य कार्यकर्ता ला त्याचा कामाची पावती मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात,त्याबद्दल सर्व आयोजक मंडळीचे याबद्दल आभार व्यक्त त्यानी केले.