वर्धा नदीच्या इस्माईलपुर मौजा मधून अवैध रेति चोरी ; तलाठी व तहसीलदार यांचे खिसे केले रेती माफिया ने गरम
लोकप्रतिनिधी सह प्रशासनाचा चांगलाच आशीर्वाद……
जेसीपी ने नदिपात्रातुन रेती चे सुरु आहे उत्खनन
ऑपरेशन इस्माईलपुर घाट ..
प्रतिनिधी / आष्टी (श ):
तालुक्यातील गोदावरी गावाच्या इस्माईलपुर मधून अवैध रेति चोरी होत आहे दिवसाढवळ्या रेति नदितुन वाहतूक होत आहे.
याआधी घाट लिलाव नसून सुद्धा रात्री दिवसा रेति चोरी सुरु होती परंतु वर्धा नदिच्या अमरावती जिल्ह्यातील जावरा गावाच्या शिवाराकडुन वर्धा जिल्ह्यातील रेति चोरिला जात आहे .
याबाबत पोलिस व महसूल प्रशासनाला माहिती असून डोळे झाक करत आहे.
इस्माईलपुर मौजा मध्ये घाट लिलाव झाला नसून तरी सुद्धा खुलेपणाने रेति गाळून मोठ मोठे ढीग लावून रात्री दिवसा त्याची वाहतूक करण्यात येत आहे यावर कोनाचा आशिर्वाद असावा असा प्रश्न नागरिकासमोर आहे. रेति घाट पाटनर देवेन्द्र बापट हा वाळूतस्कर अवैध रेतिचा उपसा
नजीकच्या तलाठी तहसीलदार , उपविभाग अधिकारी पोलिस यांच्या आशीर्वादाने हा अवैद्य वाळू उपसा करीत असल्याचे गावखेड्यात चर्चेला उधाण आले आहे .यावर जिल्हाधिकारी यानी लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहे.