वर्धा नदीत पोहायला गेलेल्या दोन युवकांचा बुडून मुत्यू
हिंगणघाट / प्रतिनिधी:
हिंगणघाट तालुक्यातील हिवरा येथील नदीत पोहायला गेलेल्या चार मित्रांपैकी दोघांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज ६ रोजी दुपारच्या सुमारास घडली,
ऋतीक नरेश पोखळे (२१) आणि संघर्ष चंदुजी लढे (१८) रा. पिपरी यांचा नदीत बुडून मृत्यू झाला तर रंणजित रामा धाबर्डे (२८) आणि शुभम सुधारकर लढे (२६) हे दोघे पाण्यातुन जीव वाचवून बाहेर पडले.
आज रविवारी दुपारच्या सुमारास पिपरी येथिल ऋतीक पोकळे, संघर्ष लढे, रंणजित धाबर्डे आणि शुभम लढे हे हिवरा येथील वर्धा नदीत पोहायला गेले. मात्र या चारही मित्रांना नदीतील पाण्याचा अंदाज आला नसल्याने दोन युवक नदीत बुडले तर दोन सुखरूप बाहेर निघाले. या घाटातून गेल्या अनेक वर्षांपासून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केल्या जात आहे. त्या मुळे नदीत अनेक ठिकाणी पंधरा ते वीस फुटापर्यंत खोल खड्डे करण्यात आले आहे. या युवकांना सदर बाब माहीत नसल्याने त्यांचा आज बळी गेला आहे,
घटनेची माहिती मिळताच हिवरा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती वडनेर पोलिस ठाण्याचे पिय.एस.आय. बागडे, बिट जमादार प्रशांत वैद्य आशिष डफ, जमादार अमोल खाडे , तुषार इंगळे, गुणवता चिडाम यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.