वर्धा येथील वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न…

0

मा.खा.रामदासजी तडस यांच्या हस्ते भोई गौरव मासिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशनमा.आमदार पंकज भोयर यांच्या हस्ते नवीन वर्षाचे भोईराज कॅलेंडरचे प्रकाशन

वर्धा : येथे १० डिसेंबर रोजी विदर्भ भोई समाज सेवा संघ शाखा,वर्धा यांच्या वतीने आकरे सभागृह,वर्धा येथे वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात भोई गौरव मासिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन माननीय खासदार रामदासजी तडस यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी विदर्भ भोई समाज सेवा संघाचे अध्यक्ष उकंडरावजी सोनवणे,उपाध्यक्ष राजाराम म्हात्रे,महासचिव मनोहराव पचारे,भोई गौरव मासिकाचे मुख्य संपादक चंद्रकांत लोणारे,भोई समाज सेवा संघाचे वर्धा जिल्हा अध्यक्ष व या मेळाव्याचे मुख्य संयोजक संजय नांन्हे, वासुदेवराव सुरजूसे, टेकचंद मारबते,गणेश इंगळे,कृष्णा नागपुरे,रमेश नागपुरे,भोई गौरव मासिक सह संपदक भोई गौरव मासिक प्रा.राहुल गौर,भोई गौरव मासिक सहसंपादक गजानन गाळवेकर,विठ्ठलराव वानखेडे, ज्ञानेश्वर सुरजुसे, मारोतराव पडाल,
बलवंत ठाकरे,सुधाकर नांन्हे, विदर्भ महिला अध्यक्ष भोई समाज सेवा संघ,वरोरा रंजना पारशिवे,विदर्भ महिला सचिव भोई समाज सेवा संघ ज्योत्सना बावणे,भोई गौरव पत्रकार रविंद्र पारीसे, भोई गौरव पत्रकार मथुरा सुरजुसे,इत्यादी उपस्थित होते,वर्धा लोकसभा क्षेत्र खासदार रामदास तडस यांनी मेळाव्याला मार्गदर्शन करताना भोई समाजात सुद्धा अशा प्रकारचे मासिक दरमहा प्रकाशित होत असते याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.या मासिकाच्या माध्यमातून समाज प्रबोधन होत आहे त्याबद्दल त्यांनी मासिकाच्या संपादक मंडळाचे कौतुक केले.आमदार पंकज भोयर यांच्या हस्ते नवीन वर्षाचे भोईराज कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले तसेच एक हात मदतीचा भोई समाज कडून विदर्भ भोई समाज सेवा संघ जिल्हा शाखा वर्धा ला चैतन्य मच्छिंद्रनाथा चे प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.भोई समाजाला संघटित होण्याची गरज आहे तसेच भोई समाज अजूनही सामाजिक, शैक्षणिक व राजकीय दृष्ट्या मागास असून या समाजाला आपल्या न्याय हक्कासाठी संघटितपणे लढा देण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.प्रस्ताविक मनोहर पचारे यांनी केले, उकंडराव सोनवणे,राजाराम म्हात्रे इत्यादींनी मेळाव्याला मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन अनिल आमझरे यांनी केले.या मेळाव्याला वर्धा, नागपूर व विदर्भाच्या जवळपास सर्वच जिल्ह्यातून वधु वर पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बऱ्याच मुला-मुलींनी स्टेजवर येऊन आपला परिचय दिला त्यामुळे परिचय मेळाव्याचे फलित झाल्यासारखे वाटले. परंतु या मेळाव्यात सुद्धा मुलाच्या तुलनेत मुलीची संख्या जास्त होती परिचय सुद्धा मुलींनीच जास्त दिला.व नोंदणी सुद्धा मुलीची जास्त झाली त्यामुळे मुले मागे का? ही खंत या मेळाव्यात सुद्धा जाणवली
कारण प्रत्येक मेळाव्यात मुलापेक्षा मुलीचीच संख्या जास्त असल्याचे निदर्शनात येते शिक्षण, नोकरी याबाबतीत मुलीचं अधिक सरस असल्याचे लक्षात आले. त्यामुळे कुठेतरी या विषयावर सामाजिक चिंतन होण्याची गरज आहे असा विचार बरेच वक्त्यांनी बोलून दाखवला या मेळाव्याला आमदार पंकज भोयर यांनी सुद्धा हजेरी लावली व मार्गदर्शन केले, मागासवर्गीय आयोगाचे सदस्य चंद्रलालजी मेश्राम यांनी सुद्धा या मेळावाला हजेरी लावली. प्रकाश डायरे यांनी सुद्धा मेळाव्याला हजेरी लावली.या मेळाव्यात दशरथ पचारे यांच्या संगीताच्या टीमने चांगलीच रांगत आणली. मेळावा यशस्वी करण्यासाठी महिला टीमने जास्त मेहनत घेतल्याचे निदर्शनात येत होते, या मेळाव्याच्या यशस्वीते करिता संजय नांन्हे,मनोहर पचारे, अभिमानजी सुरजुसे,रविंद्र भानारकर, सुदाम करलुके,देविदास पारीसे, महेश मेश्रे,हरीश पारीसे, नागोराव पचारे, रमेश कैलूके,प्रदीप बावणे,अशोक मोरे,सुनील हजारे ,सुनील ढाले,रमेश भुरे, ज्ञानेश्वर कैलुके, किशोर केळवदे, विजय पचारे इत्यादींनी परिश्रम घेतले.

सागर झोरे साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!