वर्धा लोकसभा क्षेत्रात खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन: पत्रपरिषदेत खा.तडस यांची माहिती
वर्धा, / प्रतिनिधी ;
केंद्र सरकारने नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले आहे .हॅलो इंडिया योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लहान शहरातील अनेक खेळाडू ओलंपिक पर्यंत मजल गाठू शकले आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून खेळाडूंना एक व्यासपीठ निर्माण होणार असून चांगल्या कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना निश्चितच भविष्यात देखील मदत करण्याचे आमचे कटिबद्धता हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूला प्रोत्साहन देण्याचे अनेक उदाहरण आपण बघितले आहेत. आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे याकरिता भारतीय जनता पक्ष व अमरावती जिल्हा तसेच खासदार क्रीडा महोत्सव वर्धा लोकसभा आयोजन समिती पूर्ण प्रयत्न करेल व महोत्सवाच्या माध्यमातून खेळाडू करीत संधी म्हणून समोर येईल असा मला विश्वास आहे असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळ आणि खेळाडू यांच्या प्रतिमेला प्रोत्साहन मिळावे म्हणून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत वर्धा लोकसभा क्षेत्रातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी खासदार क्रीडा महोत्सव वीस-बावीस चे आयोजन केले आहे अस्सल ग्रामीण ग्रामीण असलेल्या कबड्डी कुस्ती व शंकर पटा पटा पटा पासून ते क्रिकेट चा रणसंग्राम पर्यंत सगळ्याच खेळांचा आनंद खेळाडूंना आणि क्रीडाप्रेमींना लुटता येणार आहे.खासदार क्रीडा महोत्सवात दहा खेळांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सहा मैदानावर धनुर्विद्या क्रिकेट बास्केटबॉल हॉली बॉल बॅडमिंटन हॉकी शंकर पट कबड्डी व 36 विदर्भ केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा विदर्भस्तरीय महिला कुस्ती स्पर्धा या खेळांच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रारंभ दिनांक 2 मार्चला नांदगाव येथे धनुर्विद्या स्पर्धेत सुरुवात झाली असून वर्धा जिल्ह्यात दिनांक 10 मार्च पासून स्पर्धेची सुरुवात होणार आहे यामध्ये क्रिकेट बास्केटबॉल व्हॉलीबॉल बॅडमिंटन हॉकी कबड्डी समावेश आहे यामध्ये वर्धा लोकसभा क्षेत्रातील खेळाडूंचा समावेश जाईल शेतकऱ्यांसाठी तळेगाव टालाटुले येथे भगवान शंकर पटाचे आयोजन दिनांक 13 मार्चला करण्यात आली असून यामध्ये वर्धा लोकसभा क्षेत्रातील शेतकरी सहभागी होईल तसे 36 विदर्भ केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व विदर्भस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन दिनांक 1 एप्रिल ते तीन एप्रिल ला होणार आहे या स्पर्धेकरिता विदर्भातील अकरा जिल्ह्यातील 209 पुरुष व महिला कुस्तीगीर सहभागी होतील