वर्धा लोकसभा मतदारसंघातून हर्षवर्धन देशमुख निवडणूक लढणार..

0

आष्टी शहीद भूमीत महाविकास आघाडीची बैठक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह.

आष्टी शहीद / लोकसभा निवडणूक एप्रिलमध्ये होणार असल्याचे संकेत मिळाल्यामुळे वर्धा लोकसभा मतदारसंघातून या मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी तर्फे एक प्रगल्भ जुने जाणते नेतृत्व हर्षवर्धन देशमुख निवडणूक रिंगणात उतरले आहे शरद पवार यांनी हर्षवर्धन देशमुख यांना वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा आदेश दिला असून कामाला लागण्याचे त्यांनी सूचित केले आहे या पार्श्वभूमीवर आष्टी स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारकांचा वारसा असलेल्या आष्टी शहीद भूमी येथे 15 फेब्रुवारीला पंचायत समितीचे माजी सभापती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य प्रा अरुण बाजारे यांचे निवासस्थानी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीला वर्धा लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख वर्धा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील राऊत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सोनू भार्गव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष रेवा शंकर वाघ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र गंजीवाले महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव जितेंद्र शेटे आष्टी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष जितेंद्र शेटे आष्टी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष पप्पू देशमुख पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर होले आष्टीचे नगराध्यक्ष अनिल धोत्रे मंगेश सोनारे जिल्हा परिषदचे माजी समाज कल्याण सभापती नंदू कंगाले तालुका राष्ट्रवादी अल्पसंख्यांक अध्यक्ष आता खान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शहा मोहम्मद खान अनिल अनासाने विपिन उमाळे आर्वी राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष गोपाल मरस कोल्हे अनंत झाडे नामदेव झांबडे बैठकीसाठी उपस्थित होते बैठकीला संबोधित करताना हर्षवर्धन देशमुख यांनी सांगितले की देशातील एकूण वातावरण हुकुमशहासारखे झाले आहे आजच्या केंद्रातील सत्तेत उन्मादीत राजकारण सुरू आहे केवळ भांडवलदाराच्या पाठीशी केंद्र सरकार उभे असून गोरगरिबाकडे दुर्लक्ष होत आहे महागाईने जनता जनार्दन होरपळून निघत आहे केंद्र शासनाच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी भाजपला सत्तेतून हकलने काळाची गरज आहे अशी पुष्टी ही शेवटी हर्षवर्धन देशमुख यांनी जोडली वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे व कामाला लागण्याचे आवाहन हर्षवर्धन देशमुख यांनी याप्रसंगी केले पक्षाने व महाविकास आघाडीने निवडणूक लढविण्याचे आदेश दिले तर आपण सज्ज आहोत असेही शेवटी हर्षवर्धन देशमुख यांनी सांगितले उपस्थित महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या घोषणेचे स्वागत केले राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या सोबतच महाविकास आघाडीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नरेश भार्गव साहसिक न्यूज/ 24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!