वर्धेत शासकीय कंत्राटदारांचे बेमुदन उपोषण सुरू

साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
वर्धा जिल्हा सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना तसेच वर्धा जिल्हा कंत्राटदार कल्याण समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज 12 पासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापुढे भर पावसात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. आज पहिल्या दिवशी शासकीय कंत्राटदार विशाल शेंडे, नक्की चव्हाण, रणजित मोडक व चंद्रकांत डफ यांनी उपोषणला बसले आहेत.
वर्धा सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत डांबरीकरण करण्याची कामे मजुर सहकारी संस्थेला कुशल कामे 100 टक्के वाटण्यात आली. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना अकुशल कामं देण्यात यावी असा शासकीय आदेश असताना कोट्यवधी रुपयाची कामे मजूर संस्थेला देण्यात आली. सुशिक्षित बेरोजगार अभियंता काम वाटप समितीची एक वर्षापासुन बैठक घेण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना राखीव ठेवण्यात आलेली कामे मजूर सहकारी संस्थांना वाटण्यात आली आहेत. तसेच 10 लाखा खालील कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना वाटण्यात आलेली नसून एस.एल.आर. एस.डी.आर. (2059-2216) या फंडातील 1.00 कोटी पर्यंतची कामे मजूर सहकारी संस्थांना घेण्यात आली आहेत. मजुर सहकारी संस्थांना कामांची 1 कोटी वार्षिक मर्यादा असताना कोट्यवधींची कामे वाटप करण्यात आली. हा लहान व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांवर अन्याय आहे. कोरोनामुळे बेरोजगार अभियंत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत सविस्तर माहिती व निवेदन सर्व संबंधित विभागांना देण्यात आले. परंतु प्रशासनाकडून ठोस आश्वासन व सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने उपोषणाचे शस्त्र उचलावे लागले, असे किशोर मिटकरी यांनी सांगितले.
यावेळी किशोर मिटकरी, मुन्ना झाडे, गणेश अग्रवाल, अंकित जयस्वाल, बाबा झाकीर, रशीद शेख, सागर ढोक, अजय घवघवे, अमोल क्षीरसागर, अजय पाल, प्रणव जोशी, अमर राठोड, अनिल पसीने, प्रशांत धोटे, संजय नंदनवार, सुरज वंजारी, आकाश अवथले, महेश बोरकर, अन्नू अंदानी, विशाल वाट, वैभव गायधने, शकील खान, चंदू होरे, माया तिवारी, संजय शेरजे, निखिल नरबरीया, अनुराग दरणे, सागर नरबरीया, कुलदीप बंडवाणी, रमेश भगत, एजाज शेख, राजेंद्र गोटे, राजेश सराफ, फिरोज शेख, पुरुषोत्तम राघाटाटे, स्वप्नील कामडी, पारस मालोदे, सुधीर आठवले व जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदार व शासकीय कंत्राटदार प्रामुख्याने उपस्थित होते.