वर्ध्यातील आदित्य फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना पाट्याय यांनी ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानित करण्यासाठी बोलून त्यांना पुरस्कारापासून डावलून पैशाच्या जोरावर दिले दुसऱ्यांना
विशेष प्रतिनिधी / वर्धा :
विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्यासाठी शहरातील सार्वजनिक बजाज वाचनालयात आज दिनांक 13 मार्च रोजी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या आदित्य फाउंडेशन द्वारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये शहरातील उत्कृष्ट लिखाण करणारे पत्रकार तसेच ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते , परंतु , त्यांचा ऐन वेळी त्यांची नावे डावलून, जे लोक पैशाने पुरस्कार विकत घेतात त्यांचे नावे टाकून, वर्धा येथील जेष्ठ पत्रकार यांचे नावे डावलण्यात आले,
वर्ध्यातील आदित्य फाउंडेशन द्वारा शहरातील विविध मान्यवरांच्या मोठा गाजावाजा करून सत्कार करण्याचे आयोजन करण्यात आले होते, तसेच सत्कार मूर्तींना मोबाईल वरती मेसेज सुद्धा पाठविले होते. परंतु वेळेवरच आयोजक अर्चना पाट्या यांच्या मनात पैशाची लालूच निर्माण झाली आणि त्यांनी पत्रकारांना देण्यात येणारे पुरस्कार जे कोणत्याही क्षेत्रात कार्यरत नसताना सुद्धा त्यांच्या कडून धनलक्ष्मी घेऊन त्यांना दिले . आदित्य फाउंडेशनच्या अध्यक्ष अर्चना पाट्या फक्त प्रसिद्धी मिळण्यासाठी पत्रकारांचा वापर करून त्यांचा सन्मान करण्याचा देखावा करत असल्याचे या ठिकाणी दिसून आले, हा पुरस्कार सोहळा पैसे कमवण्यासाठी आयोजन करण्यात आले आहे. अर्चना पाट्याय या हिंदी विश्वविद्यालयात कार्यरत आहेत . पत्रकारांचा अशाप्रकारे अपमान करण्याचा अधिकार आदित्य फाउंडेशनच्या अर्चना पाट्या यांना कोणी दिला असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. काही पत्रकारांना आयोजक अर्चना पाट्या यांच्याकडून मोबाईल वर मेसेज पाठविण्यात आले की, तुमचा आज माहिती दिनाच्या निमित्ताने तुमचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामुळे वर्ध्यातील ज्येष्ठ पत्रकार त्या कार्यक्रमस्थळी पोहोचले, परंतु नागरिकांनाही माहिती होते की हे सर्व सॉंग आदित्य फाउंडेशन हे आर्थिक लाभासाठी करत असल्याने त्या ठिकाणी प्रेक्षकही उपस्थित नव्हते. आदित्य फाउंडेशनच्या अर्चना पाट्या यांना वाटले की पैशाच्या जोरावर आम्ही पत्रकारांनाही विकत घेऊ शकतो अशी त्यांची भावना असेल परंतु, प्रत्येक गोष्ट ही पैशाच्या जोरावर विकत घेऊन जाऊ शकत नाही हे अर्चना पाट्या यांना माहीत नव्हते , हे विशेष…!