वर्ध्यातील आर्वी तालुक्यात अतिवृष्टी आर्वी तालुक्यात 174.4 मिमी पावसाची नोंद देऊरवाडा गावातील 110 घरात शिरले पावसाचे पाणी
Byसाहसिक न्युज 24
प्रतिनिधी/ वर्धा:
वर्ध्यातील आर्वी तालुक्यातील पावसाची अतिवृष्टी झालीय…आर्वी देउरवाड़ा मार्गावर नाल्या न काढल्याने पावसाचे पाणी थोपले यात रात्री झालेल्या पावसामुळे देऊरवाडा गावातील 110 घरात पाणी शिरले…यामुळे गावातील अनेक कुटुंबाची अत्यावश्यक वस्तूची मोठं नुकसान झाले…गावातील रस्त्यावर घरात तीन ते चार फूट पाणी साचले होते…तालुक्यातील बाराशे हेक्टर शेतातील पीक जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहेय…
खूबगाव येथील आसुलकर यांच्या शेतातील कुक्कुटपालन शेड मधील 10 हजार कोंबड्याचा मृत्यू झाला..हेमंत आसुलकर व गजानन आसुलकर या दोन्ही भावंडांचे मोठं नुकसान झाले आहेय.. अतिवृष्टी पावसामुळे आर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तातडीने प्रशासनाने पंचनामा करून मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेय…तर काही घराची पडझड झाली आहेय…देउरवाड़ा येथील अनेक कुटुंबाची व्यवस्था शाळेत करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी दिली….