वर्ध्यातील शितला माता मंदिरामध्ये भव्य ‘नव चंडी यज्ञ’ चे आयोजन
साहसिक न्युज24
प्रतिनिधी/ वर्धा:
वर्धा येथील रामनगर परिसरात असलेल्या शितला माता मंदिरामध्ये नव चंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. हे भव्य नव चंडी यज्ञ संपूर्ण ९ व दिवस नवरात्रामध्ये सुरू राहणार आहे. या दिवसांमध्ये मातेचे पठण आणि हवन प्रथमच केले जात आहे. यासाठी श्री कमलेशजी मिश्रा महाराज हे नव चंडी यज्ञ करणार आहे. विशेष म्हणजे बेंगलोर येथील वैदिक ज्योतिष शास्त्राचे आचार्य हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार असून भक्तांच्या समस्या जाणून घेऊन.. त्यावर उपाययोजना सुद्धा ते सांगणार आहेत. तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीचे महेश सिंह ठाकुर तसेच आयोजन समितीकडून करण्यात आले आहे .