वर्ध्यातील शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख गुढेंची बदली

0

साहसिक न्युज 24 / ब्युरो रिपोर्ट :
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये मोठे बदल करण्यात आले होते. दरम्यान, शिवसेनेतर्फे संपर्क प्रमुख म्हणून अमरावतीचे माजी खा. अनंत गुढे यांना वर्धा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्याविषयी अनेक शिवसैनिकांमध्ये नाराजी तसेच अनेकांनी तक्रारी केल्याने गुढे यांची उचल बांगडी झाली. त्यांची उचलबांगडी झाल्याने जिल्ह्यातील त्यांचे दोन्ही विश्‍वासू जिल्हा प्रमुखांचे काय असा प्रश्‍न शिवसैनिकांना पडला आहे. जिल्हा संपर्क प्रमुखपदी ठाणे येथील बाळा राऊत यांची वर्णी लागली आहे.
माजी खा. अनंत गुढे यांच्या कारभारामुळे पक्षात असंतोष निर्माण झाला होता. त्यांनी जिल्हा कार्यकारीणीत स्वत:च्याच नातेवाईकांचीच वर्णी पदाधिकारी म्हणून लावल्याची तक्रार थेट पक्षनेतृत्वाकडे करण्यात आली होती. गेल्या महिन्यात तुषार देवढे यांनी शिवसेनेच्या संपर्क अभियानात मुंबईच्या पाहुण्यांपुढे गुढे यांच्यावर गरळ ओकली होती. अनेक शिवसैनिकांनी तक्रारीची शिवसेना नेतृत्वाने दखल घेतली असून त्यांची ऊचलबांगडी करण्यात आली. या नियुक्तीचे जिल्ह्यातील शिवसैनिकांनी स्वागत केले असून पक्ष नेतृत्वाचे आभार मानले.
माजी खा. गुढे यांच्या त्रासाला कंटाळून राजेश सराफ यांनी सर्वात आधी जिल्हाध्यक्षपदाचा राजिनामा दिला होता. ज्यांनी हिंगणघाट सारख्या मतदार ताब्यात घेतला होता असे माजी मंत्री अशोक शिंदे यांचे गुढे यांच्यासोबत मतभेद झाल्यानेच राजिनामा दिला होता. सराफ यांच्या नंतर देवळी आणि आर्वी विधानसभा मतदार संघासाठी पुलगावचे बाळा शहागडकर तर वर्धा आणि हिंगणघाट मतदार संघासाठी सेलूचे अनिल देवतारे या दोघांची जिल्ह प्रमुख म्हणून गुढे यांनी नियुक्ती केली होती. आता गुढे यांचीच उचलबांगडी झाल्याने या दोन जिल्हा प्रमुखांचे वाली कोण असे दुखावलेले शिवसैनिक प्रश्‍न विचारत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!