वर्ध्यात प्रथमच झाले यातना आंदोलन
प्रतिनिधी / वर्धा :
पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंबलबजावणी करा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज वर्ध्यातील जिल्हयाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर करण्यात आलेल्या यातना आंदोलनात सामाजिक कार्यकर्ता विल्सन मोखाडे चांगलेच रक्तबंबाळ झालेय. पोलिसांनी सावधगिरी पाळत तत्काळ त्यांना जिल्हासमान्य रुग्णालयात दाखल करीत उपचार सुरू केले. या आंदोलनात विल्सन मोखाडे पुतळ्यापुढे नारे देत होते. पण विल्सन मोखाडे यांनी अचानक स्वत:च्या डोक्यावर काचेच्या शिश्या फोडणे सुरू केल्यानंतर पोलिसांची भांबेरी उडाली आणि क्षणात यांना ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले. संपादक रवींद्र कोटंबकर यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर लुटमारीचा गुन्हा दाखल करावा , हल्ला प्रकरणी पालकमंत्री केदार यांच्यावर गुन्हा दाखल करावा,आदी मागण्याची पूर्तता झालीच पाहिजे, याकरीता हे यातना आंदोलन करण्यात आले.शरीरावर प्रहार करून स्वतच्या अंगातून रक्ताच्या धारा काढणे, हा अफलातून प्रकार आज वर्धेकरांनी अनुभवला. जीवघेण्या आंदोलनात आज विल्सन मोखाडे बचावले असले तरी असे आंदोलन करण्याची गरज कोणामुळे भासली , याबाबत चिंतन करण्याची गरज पोलिस प्रशासनाला असल्याची जनसामान्यात चर्चा आहे.