वर्ध्यात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
साहसिक न्युज24
गजेंद्र डोंगरे/ वर्धा :
कारंजा तालुक्यातील बांगडापूर जंगल परिसरात जनावरे चारायला गेलेल्या गुरखाचा वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज सायंकाळी उघडकीस आली.
मृतक होरेश्वर घसाळ असे मृत गुराख्याचे नाव आहे. गुराखी हा दररोज जनावरे चरण्यासाठी जात असतां आजही जनावरे चारायला गेला होता.मात्र घनदाट जंगलात सध्या वाघ आढळत असतां त्याच्यावर सायंकाळ सुमारास हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.या वाघाच्या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.चरायला गेलेले जनावरे घरी परत आले मात्र होरेश्वर हा परत आला नसल्याने त्याला बघायला गेलेल्या नागरिकांना त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून रात्री वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.