वर्ध्यात वादळ वाऱ्याचा कहर; घराचे छत पडून वूध्द महिलेचा मृत्यू तर एक जखमी
साहसिक न्युज 24
देवळी/ सागर झोरे:
तालुक्यातील गिरोली येथील वादळ वारा जोरात झाल्यानं घर पडल्यानं एका वूध्द महिला दबून मरण पावली तर एक गंभीर जखमी झाले आहेत.
रंगुबाई देवराव चीडाम असं मरण पावलेल्या वुध्द महिलेच नाव आहे.हि महिला वार्ड क्रमांक 1 येते राहत होती. त्या घरामध्ये आपल्या सुनेसोबत झोपून असताना अचानक वादळ वारा आल्याने घराच्या वरच्या टिना उडाल्या व सज्जा पडल्यान रंगुबाई देवराव चीडाम या त्यामध्ये दबून जागीच मरण पावल्या तर त्याची सुन अर्चना रविंद्र चीडाम या जखमी झाल्या व दोन मुलं सुदैवाने वाचले या घटनेमुळे गिरोली गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती होताच गिरोलीचे सरपंच प्रतिभा ढगे,पोलीस पाटील स्मिता थूल,व गावातील सदस्यांनी भेट देऊन त्या कुटुंबाला मदत मिळावी अशी मागणी शासनाकडे केली आहे.