वर्ध्यात हरणाच्या मटनावर ताव – वर्ध्यात हरणाची शिकार करून केली हॉटेलात पार्टी!
वर्ध्यातील सावंगी येथील ‘ठाकरे किचन’ मधली धक्कादायक घटना
हरणाची शिकार करून पार्टी करणाऱ्या अकरा जणांवर गुन्हा दाखल
दोन आरोपींना वनविभागाने केले अटक नऊ फरार
हरणाच्या मटणाची पार्टी मध्ये शहरातील बिल्डरांचा समावेश असल्याची वनविभागात चर्चा
हरणाच्या शिकारीचा मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती
वर्ध्याच्या आंजी परिसरातून हरणाची शिकार केल्याची प्राथमिक माहिती
सावंगीच्या चौकातील ‘ठाकरे किचन’ या हॉटेल मध्ये मटणाची पार्टी झाल्याची माहिती
अर्जुन सिंग राहणार आंजी (मोठी) येथील मुख्य आरोपी असल्याची वनविभागाची माहिती
हरणाच्या मटनावर ताव मारणाऱ्या अकरा आरोपींवर गुन्हा दाखल
वर्ध्यात हरणाची शिकार करून हॉटेलात पार्टी करणाऱ्यांना ही पार्टी चांगलीच भोवली आहे. वर्ध्याच्या सावंगी येथील ‘ठाकरे किचन’ रेस्टॉरंट मध्ये ही हरिणाच्या मटणाची पार्टी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.. हरणाची शिकार करून पार्टी करणाऱ्या अकरा जणांवर वनविभाग कायद्या नुसार गुन्हा दाखल केला, असून आतापर्यंत दोन आरोपींना वनविभागाने अटक केली आहे. हरीणाच्या पार्टी मध्ये एक माजी उपसरपंच व एक माजी सरपंचच्या देखील समावेश असल्याची वनविभागात चर्चा सुरू आहे हरणाच्या शिकारीचा मुख्य आरोपी फरार असल्याचे वनविभागाकडून सांगितले जात आहेय.
वर्धे पासुन १५ किलोमीटर अंतरावर आंजी मोठी परिसरात हरणाची शिकार केल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. सावंगी टी पॉईंट चौकातील ‘ठाकरे किचन’ रेस्टॉरंट मध्ये हरणाच्या मटणाची पार्टी केल्याची तपासात पुढे आले आहे.. अर्जुन सिंग राहणार आंजी (मोठी) येथील मुख्य आरोपी असल्याची वनविभागाकडून सांगण्यात आले असून हरणाच्या मटनावर ताव मारणाऱ्या आरोपींची संख्या वाढण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे… यामधील आरोपी मनोज ताइडे , दिलीप उरकुड़े , सुरेश वैद्य , रमेश साथोने , मून , प्रभाकर चौदे, उत्तम कांबले , घनशम गांधी , महेंद्र गेडाम यासह ३ सर्व रहनार सावंगी मेघे असे नावे आहेत…
सहासिक न्यूज – 24 वर्धा