वर्ध्यात IPL क्रिकेट सट्टा जुगारवर सावंगी पोलीसाची धाड

0

By साहसिक न्युज 24
प्रतिनिधी/वर्धा:
सावंगी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या टीटी नगर गुप्ता अपार्टमेंट येथे सुरु असलेल्या IPL क्रिकेट च्या फायनल मॅचवर काही इसम फ्लॅटमध्ये मोबाईलवर राजस्थान रॉयल्स व गुजरात टायटन्स यांचेदरम्याण सुरु असलेल्या फायनल मॅचवर हारजितचा क्रिकेट सट्टा खेळत आहे अशा माहितीवरुन पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी एक पथक तयार करून त्यामध्ये पोलिस उपनिरीक्षक रुचिरा पात्रे, पोलीस नाईक आकाश चुंगडे , स्वप्नील मोरे, दिनेश करलुके, प्रकाश खार्डे पाठविले.
फ्लॅटमध्ये जावुन खात्री केली असता त्या ठिकाणी तीन ईसम मोबाईलवर क्रिकेट मैचवर सट्टा व जुगार खेळत असल्याचे दिसले त्यांचे ताब्यातुन 1 लॅपटॉप , 2 टॅब, 9 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल , 2 मोपेड गाड्या 5 ईतर साहित्य असा एकुण 2 लाख 52 हजार 712 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.व आरोपी विरुध्द कलम 4,5 मुंबई जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर , अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके , उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!