🔥वस्ताद लहूजी साळवे आणि शहिद बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंती निमित्त शहरात नाश्ता वाटप
वर्धा -/ आद्य क्रांतीगुरु वस्ताद लहूजी साळवे आणि क्रांतीसुर्य शहिद बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंती चे औचित्य साधून गरजूंना गरमागरम नाश्त्याचे वाटप करण्यात आले.दि.१८ नोव्हेंबर रोजी शहरातील रेल्वे स्थानक, बजाज चौक,साई मंदिर आणि बस स्थानक चौक या प्रमुख भागांत या अन्नदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यापूर्वी शहरात दरवर्षी प्रमाणे यंदाही दि.१४ नोव्हेंबर रोजी वस्ताद लहूजी साळवे आणि दि.१५ नोव्हेंबर रोजी शहिद बिरसा मुंडा यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली होती.याच जयंती उत्सावाचा एक भाग म्हणून हा सामाजिक उपक्रम राबवून गरजूंना मदतीचा हात देण्यात आला.या महत्वपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी साप्ता . वर्धा की बात चे संपादक विल्सन मोखाडे यांच्या सह प्रदिप उर्फ रावण कांबळे, निरंजन मेंढे अनिल पवार,आवेज शेख,जितू गोरडे,आसिफ खान प्रामुख्याने उपस्थित होते.जयंती च्या निमित्ताने राबवण्यात आलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.