वानाडोंगरीत ले-आउट मोजणीवरून वाद….

0

🔥वानाडोंगरीत ले-आउट मोजणीवरून वाद.🔥ह्याच त्या डॉ.सारिका कडू उपअधीक्षक भूमी अभिलेख हिंगणा यांची महसूल मंत्र्या.कडे तक्रार.

नागपूर -/ मौजा वानाडोंगरी (प.ह.न. 46) येथील ले-आउट धारक पंडित देवीकर यांच्या जागेची मोजणी मोजणी अधिकारी राजकुमार धनगरे यांनी केली. ही मोजणी बिगरशेती ले-आउट म्हणून करण्यात आली असून त्यात हद्द कायम करण्यात आली.मात्र, शेजारील शेतकऱ्याच्या पिकातच डिमार्केशन करण्यात आल्याने स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की पिकाचे नुकसान टाळण्यासाठी मोजणी पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु ती मान्य झाली नाही. त्यामुळे आक्षेप निवारण न होता मोजणी पार पडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.या प्रकरणात अर्जदाराच्या ताब्यातील जागेपुरतीच मोजणी व्हायला हवी होती, शेजारच्या शेतात पिकं उभी असताना डिमार्केशन करणे योग्य नव्हते, असे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात नारायण डाखळे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे डॉ. सारिका कडू उपअधीक्षक भूमी अभिलेख हिंगणा यांच्या नावानिशी तक्रार दाखल केली आहे.या घडामोडींमुळे वानाडोंगरी परिसरात शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

गजानन ढाकूलकर साहसिक News-/24 हिंगणा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!