विकास हिंदी विद्यालयातील शिक्षक भरती संशयाच्या भोवयात, शिक्षण विभागाकडून तक्रारदारावरच दबाव टाकण्याचा प्रयत्न….

0

🔥विकास हिंदी विद्यालयातील शिक्षक भरती संशयाच्या भोवयात,

🔥शिक्षण विभागाकडून तक्रारदारावरच दबाव टाकण्याचा प्रयत्न

 यवतमाळ -/ पांढरकवडा येथील विकास हिंदी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक भरती, मान्यता व वेतन प्रकरणातील कथित अनियमिततेवरून सुरू असलेल्या SIT संदर्भातील चौकशीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रारदार संतोष प्रभाकर पेंढारवार यांनी शिक्षण विभागाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष तसेच विकास हिन्दी विद्यालय, पांढरकवडा ता. केळापूर जि. यवतमाळ या शाळेचे सचिव आनंद किशोर वैद्य यांनी शाळेत शासनाची कोणतीही नोकर भरती आदेश किंवा परवानगी नसतांना १० जागा भरलेल्या आहे व त्यांचे बोगस आयडी काढून त्या शिक्षक/कर्मचारी यांचे वेतन सुरू केले आहे. त्यामुळे शासनाची जवळपास १० कोटी रूपयांची फसवणुक झाल्याचा संतोष पेंढारवार यांचा आरोप आहे. शाळेचे मुख्याध्यापक म्हणून त्यांच्या पत्नी नामे सौ. अनुश्री आनंद वैद्य यांची नियुक्ती सेवा जेष्ठता यादी डावलुन केली. सन २०१२ नंतर राज्यात भरती बंद असतांना शिक्षक/कर्मचारी यांची बॅकडेट मध्ये नियुक्ती दाखवुन २०२४ मध्ये अप्रूवल व बोगस आयडी आणलेली आहे. या कामासाठी त्यांना शिक्षण विभागातील अधिकारी तसेच कर्मचा-यांनी मदत केल्याचा आरोप आहे. २०२४ मध्ये अप्रुवल/आयडी आल्यानंतर २०१६ पासूनचे थकीत २०२४ मध्ये जमा झालेले आहे. त्यांची सुध्दा सखोल चौकशी SIT मार्फत करून शासनाच्या कोट्यवधी रूपयाची वसुली संस्था चालक आनंद वैद्य यांच्याकडून करण्यात यावी. गेल्या एक वर्षापासून अधिकारी, आमदार, शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रारी केल्यानंतरही थातुरमातुर कारवाई होत असल्यामुळे संतोष पेंढारवार यांनी स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.

🔥तक्रारदाराला त्रास देण्याचा प्रयत्न

चौकशीचा केंद्रबिंदू संस्था व संबंधित अधिकारी असताना, उलटपक्षी तक्रारदारालाच वारंवार नोटिसा पाठवून सुनावणीस बोलावले जात असल्याचा आरोप केला आहे. “उपस्थित नसल्यास एकतर्फी निर्णय” अशा शब्दप्रयोगांमुळे दबावाचे वातावरण तयार होत आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, मूळ संचिका, सेवा पुस्तके, वेतन देयके, वरिष्ठता यादी, कार्यकारिणी इतिवृत्त यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे संबंधित कार्यालयांकडे उपलब्ध असताना ती तपासण्याऐवजी तक्रारदारावरच जबाबदारी ढकलली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात मा. विभागीय शिक्षण उपसंचालक, अमरावती यांच्या पत्रानंतर SIT चौकशी अपेक्षित असताना विभागाने स्वतंत्र पथक नेमलेले नाही. त्यामुळे सखोल चौकशी ही विभागाबाहेरील स्वतंत्र यंत्रणेकडून व्हावी, अशी मागणी संतोष पेंढारवार यांनी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!