विजेच्या धक्क्याने बिबटाचा मृत्यू
वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील जयपूर येथे शिकारीसाठी उंच झडप मारणाऱ्या बिबट्याचा रोहित्राला करंट लागुण मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
पहाटेच्या दरम्यान बिबट्याने माकडाची शिकार करण्यासाठी शेत शिवारातील रोहित्रावर छलांग मारली असावी आणि यातच त्याचा शॉक लागून मृत्यू झाला असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे. जयपूर गावानजीक असलेल्या शेताजवळील वीजपुरवठा अचानक खंडित झाला होता. त्यामुळे पहाटे शेतकऱ्यांनी परिसरातील इलेक्ट्रिक रोहित्राची पाहणी केली. दरम्यान चक्क बिबट रोहित्राच्या तारावर अडकून पडला असल्याचे दिसून आले आहेय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. वन विभागाला कळविण्यात आले आहेय. वनविभागाने लगेच घटनास्थळी भेट देऊन बिबट्याचे शव विच्छेदन करण्यात आले आहे.