विठोबाचौक इंदिरा गांधी पुतळ्याच्या मागे सहा दुकाने फोडली,चोरटे सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद…..

0

🔥विठोबाचौक इंदिरा गांधी पुतळ्याच्या मागे सहा दुकाने फोडली,चोरटे सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद..

हिंगणघाट -/ शहरात मध्यरात्री चोरट्यांनी धाडसाचा कळस गाठत मुख्य विठोबा चौक इंदिरा गांधी पुतळ्याच्या मागे आठवडी बाजारातील तब्बल सहा दुकाने फोडून रोख रकमेसह कापड, धान्य व हार्डवेअरचा माल लंपास केला. शहराच्या मुख्य मार्गावर घडलेल्या या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी शहरातील गर्दीच्या आठवडी बाजारातील सहा दुकानत, एक धान्य दुकान आणि एका हार्डवेअर दुकानाच्या गोडाऊनवर हात साफ केला. सर्व दुकानांमध्ये प्रवेश करण्यासाठी चोरट्यांनी वरच्या टीन कटरने कापून आत प्रवेश केल्याचे उघड झाले आहे. सकाळी व्यापारी आपली दुकाने उघडण्यासाठी आले असता ही घटना उघडकीस आली.
स्वस्त कापड दुकानातून नगदी १ लाख रुपये बेडशीड ३० हजार रुपये, गुरुदेव क्लॉथ स्टोअर मधून नगदी २० हजार सोप्याच्या कव्हर, बेडशीट ६० हजार रुपयांचा कपड्यांचा रुपयांची रोकड नेण्यात आली. श्री शगुन शॉपिंग मॉल मधून ७ हजार रुपयांची चिल्लर, चोरट्यांच्या हाती लागली. न्यु. पायल ट्रेडर्स या धान्य दुकानातील ठेवलेली रोकड उचलून नेण्यात आली, तर शंकर हार्डवेअर दुकानाच्या गोडाऊन मधून मोठ्या प्रमाणात माल व नगदी रुपये चोरी केले . दीपक मोतीला किराणा येथुन ५ हजार रुपये हात साफ केले तसेच विष्णू किराणा दुकानातही चोरीचा प्रयत्न करण्यात आला, मात्र चोरट्यांना येथे यश आले नाही.
या सलग धाडसी कारवाई मुळे व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून शहरातील व्यापारी वर्गात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, सतत वाढणाऱ्या चोऱ्या व घरफोड्यांमुळे हिंगणघाटमध्ये कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडत असल्याचे स्पष्ट दिसते.
पोलिसांसमोर नवे आव्हान
घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून परिसरातील हे एका फ्रुट कंपनीच्या सी.सी.टीव्ही मध्ये फुटेज मिळाले आहे. शहरातील विठोबा चौकातील लावलेले सी.सी.टीव्ही कॅमेरे निकामी असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. “शहरात लावलेले सी.सी.टीव्ही फक्त शोभेच्या वस्तू आहेत का?” असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
जनमानसातील चिंता
शहरात सलग चोरीच्या घटना घडत असल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाने तातडीने गस्त वाढवून, सी.सी.टीव्ही कॅमेरे दुरुस्त करून गुन्हेगारांना गजाआड करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पोलिसांसमोर आता चोरट्यांचा शोध घेणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.
मध्यरात्रीच्या या धाडसी चोरीच्या मालिकेने हिंगणघाट शहरात कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यापारी संघटनांकडून होत आहे. पुढील तपास वर्धा क्राइम ब्रांच करीत आहे.

ईकबाल पहेलवान साहसिक News-/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!